अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर

By तेजल गावडे | Published: October 17, 2020 08:15 PM2020-10-17T20:15:34+5:302020-10-17T20:16:18+5:30

राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा आगामी चित्रपट छलांगचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Finally, the trailer of Rajkumar Rao and Nusrat Bharuch's 'Chhalang' has been released | अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर

अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा आगामी चित्रपट छलांगची सगळीकडे खूप चर्चा होताना दिसत होती. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. अखेर या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहताने केले आहे. हा चित्रपट लव फिल्म्सचे प्रोडक्शन आहे आणि गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अजय देवगण, लव रंजन, अंकुर गर्ग निर्मित छलांग चित्रपटात राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांच्यासोबत सौरभ शुक्ला, सतीश कौशिक, जीशान अयुब, इला अरूण आणि जतिन सरना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

छलांग चित्रपटाचा ट्रेलरची सुरूवात खूप मजेशीर आहे जो पाहून अंदाज लावू शकतो हा चित्रपट कॉमेडीने परिपूर्ण आहे. राजकुमार राव आणि नुसरत भरूचा दोघांचेही काम पाहून चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखीन वाढते.

चित्रपटाची कथा मोंटू नामक पीटी शिक्षकाभोवती फिरते. जो पीटीकडे फक्त एका नोकरीच्या दृष्टीकोनातून पाहतो आहे. एका परिस्थितीमुळे मंटू सर्व काही पणाला लावतो. ज्यात तो नीलूदेखील आहे जिच्यावर त्याचे प्रेम असते. मंटू त्या गोष्टी करायला तयार होतो ज्या त्याने कधी केल्या नाहीत आणि कधी त्याचे प्रशिक्षणही घेतलेले नाही.


छलांगबद्दल राजकुमार राव म्हणाला की, छलांग मला माझ्या शालेय जीवनात पुन्हा घेऊन गेला. हा एक विशेष सिनेमा आहे एक खरा कौटुंबिक सिनेमा आहे. कौटुंबिक मनोरंजनासोबत हा चित्रपट प्रेक्षकांना चांगला संदेश देत बालपणींच्या आठवणींना उजाळा देतो.
छलांग चित्रपट १३ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Finally, the trailer of Rajkumar Rao and Nusrat Bharuch's 'Chhalang' has been released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.