'कसम से' या टेलिव्हिजन सीरीयलमधील आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री प्राची देसाईने चित्रपट 'रॉक ऑन', 'वन्स अपॉन ए टाईम इन मुम्बई' आणि 'बोल बच्चन' यांसारखे सुपरहिट सिनेमे दिले परंतु, तरिही प्राची बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळवू शकली नाही.गेल्या काही वर्षापासून ती बॉलिवूड लांबच आहे. कोणत्याही सिनेमात ती झळकली नव्हती. प्राचीचे चाहतेही तिच्या कमबॅकची वाट बघत होते. दरवेळी चाहते फक्त तिला तिच्या कमबॅक विषयीच प्रश्न विचारताना दिसायचे. 


अखेर चाहत्यांची ईच्छा प्राचीने पूर्ण केली आहे. लवकरच प्राची रसिकांच्या भेटीला येणार आहे.  'सायलेन्स कॅन यू हियर इट' या सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे प्राची पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे.   प्राची या सिनेमात निरीक्षक संजनाची भूमिका साकारत अत्यंत धाडसी अशी ही भूमिका आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात मनोज बाजपेयी आणि अर्जुन माथुर यांच्याही भूमिका आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्राचीने सांगितले की,इन्स्पेक्टर संजनाला कोणत्याही गोष्टीत हार मानायची नसते. बेधडकपणे ती आलेल्या गोष्टींचा सामना करते.   यापूर्वी मला चाहत्यांनी कधीही अशा प्रकारची भूमिका साकारताना पाहिले नव्हते त्यामुळे ही भूमिका पाहिल्यानंतर रसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 

प्राची देसाईच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला चालता येत नाही. त्यामुळे मुंबई एअरपोर्टवर ती व्हीलचेअरवर दिसली. तिला असे पाहून चाहत्यांना धक्का बसला. या दरम्यान, प्राचीने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती. प्राचीचे हे व्हीलचेअरवरील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत आणि चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत आणि प्रार्थना करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Finally, Prachi Desai returns to the silver screen as a cop for the first time in her next Silence Can You Hear It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.