finally Kareena Kapoor shares FIRST glimpse of her Newborn Son Says there is nothing women cant do | finally महिला दिनाचे औचित्य साधत करिना कपूरने दाखवली छोटे नवाबची झलक, शेअर केला CUTE फोटो

finally महिला दिनाचे औचित्य साधत करिना कपूरने दाखवली छोटे नवाबची झलक, शेअर केला CUTE फोटो

करिना कपूर खान सध्या छोटे नवाबसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. दुस-या बाळाच्या जन्म झाल्यापासून चाहत्यांनाही छोटे नवाबला पाहण्याची उत्सुकता होती. मात्र अजूनपर्यंत बाळाची झलक पाहायला मिळाली नव्हती. अखेर महिला दिनाचे औचित्य साधत करिनाने चाहत्यांना छोटे नवाबची झलक दाखवली आहे. बाळाला कुशीत घेत्याचा फोटो तिने शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटो बाळाचा चेहरा दिसत नसला तरी एक झलक पाहायला मिळाल्यामुळे चाहत्यांनीही कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 


पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला त्यावेळी सैफ व करिना काही दिवसानंतरच कॅमे-यासमोर आले होते. तैमूरची झलक त्यावेळी पहिल्यांदा अख्ख्या जगाने पाहिली होती. पण यावेळी मात्र अद्याप तरी बेबोने आपल्या मुलाची झलक दाखवली नव्हती. शेवटी छोटे नवाबचा चेहरा दिसत नसला तरी झलक दाखवली आहे.

करीना एका व्हर्चुअल लाईव्ह व्हिडीओ कॉन्फीन्सद्वारे आपल्या बाळाची ओळख करुन देणार आहे. परिणामी चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या बघता, तूर्तास तरी मीडियासमोर न येण्याचा निर्णय करिना व सैफने घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे ते आपल्या दुस-या मुलाची एक झलक चाहत्यांना दाखवू शकतात. रिपोर्टनुसार, दुस-या मुलाला जगासमोर आणण्याची जबाबदारी करिनाची असेल. लवकरच बेबो सोशल मीडियावर मुलाचा फोटो आणि त्याच्या नावाचा खुलासा करणार आहे.

रणधीर कपूर सांगतायेत, करिना कपूरचे बाळ दिसते घरातील या सदस्यासारखे

करिना आणि सैफला बाळ झाल्यापासून त्यांचे बाळ कसे दिसते याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. करिना आणि सैफचे बाळ कसे दिसते हे नुकतेच करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी सांगितले आहे. रणधीर यांनी टाईम्स ग्रुपशी बोलताना सांगितले की, सगळीच बाळं सारखीच दिसतात. त्यामुळे बाळ कोणासारखे दिसते हे मला सांगता येणार नाही. पण सगळ्यांचे म्हणणे आहे की, बाळ अगदी त्याच्या मोठ्या भावासारखे म्हणजेच तैमुर सारखे दिसते. छोट्या बाळाच्या आगमनामुळे तैमुर प्रचंड खूश झाला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: finally Kareena Kapoor shares FIRST glimpse of her Newborn Son Says there is nothing women cant do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.