film on sushant singh rajput death nyay teaser released | Nyay-The Justice : सुशांत सिंग राजपूतवर येतोय सिनेमा; टीजर पाहून भावुक व्हाल

Nyay-The Justice : सुशांत सिंग राजपूतवर येतोय सिनेमा; टीजर पाहून भावुक व्हाल

ठळक मुद्देया सिनेमात अभिनेता अमन वर्मा यांनी ईडी प्रमुखाची भूमिका साकारली आहे. असरानी यांनी सुशांतच्या वडिलांची तर शक्ती कपूर यांनी एनसीबी प्रमुखाचे पात्र रंगवले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput ) याच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. पण त्याच्या या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर साकारलेला सिनेमा मात्र बनून तयार आहे. काही क्षणांपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला. ‘न्याय- द जस्टिस’ असे या सिनेमाचे नाव आहे. येत्या 11 जूनला सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होतेय. त्यादिवशी दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली देत हा सिनेमा रिलीज केला जात आहे. (Sushant Singh Rajput life based film Nyay : The Justice ) 

विकास प्रॉडक्शनअंतर्गत तयार असलेला हा सिनेमा सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर बेतलेला आहे. अभिनेता जुबेरने यात सुशांतची व्यक्तिरेखा साकारली आहे तर श्रेयाने रिया चक्रवर्तीचे पात्र जिवंत केले आहे. 58 सेकंदाचा सिनेमाचा टीजर जबरदस्त आहे. टीजरची सुरुवात होते ती सुप्रसिद्ध अभिनेता महिंदर सिंग याच्या मृत्यूच्या  ब्रेकिंग न्यूजने. टीजर जसा जसा पुढे जातो, तसे सुशांतचे संपूर्ण प्रकरण डोळ्यासमोर येते. सुशांत प्रकरणात तीन तपास संस्थांचा तपास, सुशांतने आत्महत्या का केली? या प्रश्नाचा शोध असे सगळे पाठोपाठ टीजरमध्ये दिसते.

दिलीप गुलाटी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. दिलीप गुलाटी यांनी सांगितले की, ‘सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला होता. मी सुशांतला व्यक्तिश: ओळखत नव्हतो. पण जणू आपल्या जवळचे कुणी जावे, असे मला वाटले. या सिनेमाच्या माध्यमातून आत्महत्या ही कोणत्याही समस्येवरचे उत्तर नाही, हा संदेश आम्ही देऊ इच्छितो. आयुष्यातील अडचण कितीही मोठी असो, ती सोडवण्यासाठीचा एक पर्याय प्रत्येकाजवळ असतो. आमचा सिनेमा सुशांतला एक श्रद्धांजली आहे.’
या सिनेमात अभिनेता अमन वर्मा यांनी ईडी प्रमुखाची भूमिका साकारली आहे. असरानी यांनी सुशांतच्या वडिलांची तर शक्ती कपूर यांनी एनसीबी प्रमुखाचे पात्र रंगवले आहे. सुधा चंद्रन सीबीआय प्रमुख म्हणून दिसतेय.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: film on sushant singh rajput death nyay teaser released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.