ठळक मुद्दे'कोलावरी डी' या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले होते.

‘कोलावरी डी’  या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता धनुष याचा आज वाढदिवस.  धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. पण आज आम्ही तुम्हाला धनुषबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.
28 जुलै 1983 रोजी जन्मलेल्या धनुषचे  खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा तो मुलगा आहे. वयाच्या 16 व्या वर्षी धनुषने  वडिलांच्या  ‘थुल्लुवाधो इलामाई’ या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे ‘रांझणा’ आणि ‘षमिताभ’ या बॉलिवूड चित्रपटांतही तो झळकला.


 
खरे तर धनुषला अभिनयात अजिबात रस नव्हता. धनुषचे वडील कस्तूरी राजा मोठे दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांच्या घरात सतत साऊथच्या दिग्गज अभिनेत्यांनी ये-जा असे. पण कुठलाही अ‍ॅक्टर आला की, धनुष स्वत:ला एका खोलीत कोंडून घेई. यानंतर वडील आणि भावाने धनुषला कसेबसे अभिनयासाठी राजी केले.

धनुष म्हणायला मोठ्या दिग्दर्शकाचा मुलगा होता. पण तरीही त्याला टीका सहन करावी लागली. हिरो बनण्यासारखा तुझा चेहरा नाही, असे त्याला सर्रास ऐकवले जाई. पण प्रतिभा आणि आत्मविश्वास या जोरावर धनुषने साऊथ इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडमध्येही त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली.

 धनुष 2004 साली रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. एका सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी दोघांची भेट झाली होती. या सिनेमातील धनुषचा अभिनय पाहून ऐश्वर्या कमालीची प्रभावित झाली होती. त्यानंतर तिने त्याला बुके पाठवला आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. वर्षभरानंतर दोघे लग्नगाठीत अडकले.  ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.  

 

'कोलावरी डी' या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले होते. धनुषने या गाण्याचे बोल केवळ सहा मिनिटांत लिहिले होते. तर गाण्याच्या रेकॉर्डिंगला 35 मिनिटांचा कालावधी लागला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: few facts about actor dhanush on his special birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.