farhan akhtar troll due to appreciation srinivas bv |  मी नक्कीच तुम्हाला भेटेन आणि मिठी मारेन! फरहान अख्तरने केले काँग्रेस नेत्याचे कौतुक, झाला ट्रोल

 मी नक्कीच तुम्हाला भेटेन आणि मिठी मारेन! फरहान अख्तरने केले काँग्रेस नेत्याचे कौतुक, झाला ट्रोल

ठळक मुद्दे फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा ‘तुफान’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेला अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या  प्रचंड ट्रोल होतोय. होय, फरहानने भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही (Srinivas BV) यांचे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आणि अनेकांनी फरहानला ट्रोल करायला सुरुवात केली. काँग्रेस नेत्यांचे कौतुक करतोस, तसे इतरांचे कौतुक का करत नाहीस? हा दुटप्पीपणा नाही का? असा सवाल करत लोकांनी फरहानला ट्रोल केले.


‘मी कधी श्रीनिवास बीव्ही यांना भेटलेलो नाही. पण ही महामारी  संपताच मी नक्कीच तुम्हाला भेटेन आणि तुम्हाला मीठी मारेन,’ असे ट्विट फरहानने केले.
देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना श्रीनिवास बी व्ही यांनी आत्तापर्यंत आपल्या 1 हजार कार्यकर्त्यांच्या मदतीने हजारो कोरोना रूग्णांना मदत केली आहे. गरूजूंना आॅक्सिजन, प्लाज्मा पुरवण्यापासून तर रूग्णांला बेड मिळवून देणे, त्यांना रूग्णालयात भरती करणे, त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था करणे अशा स्वरूपात त्यांची मदत सुरू आहे. त्यांच्या या कार्याचे सध्या सर्वस्तरावर कौतुक होत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. फरहाननेही त्यांचे कौतुक केले पण अनेकांना ते रूचले नाही. अनेकांनी यासाठी फरहानला ट्रोल केले.

 

 फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा ‘तुफान’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे हा प्लान रद्द करण्यात आला. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या सिनेमात परेश रावल कोचच्या भूमिकेत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: farhan akhtar troll due to appreciation srinivas bv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.