गेल्या महिन्यांपासून फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर खुल्लेआम रोमान्स करताना दिसत असतात. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे प्रेम कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघे सतत व्हेकेशन , पार्टी आणि इव्हेंटसला एकत्र दिसतात.

शिबानी आणि फरहान गेल्या एका वर्षांपासून जास्त एकमेकांना डेट करत आहेत. फरहान अख्तर व शिबानी दांडेकर हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. फरहानने तर कित्येक वेळा शिबानीसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करून जाहीर केले आहे.


आजतकच्या रिपोर्टनुसार फरहान आणि शिबानी फेब्रुवारी किंवा मार्च 2020मध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. दोघे आपल्या नात्याला एक पाऊल पुढे नेऊ इच्छित आहेत. याबाबतची अद्याप कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुले आहेत. आता तर हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Farhan akhtar shibani dandekar planning wedding in february march 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.