Farhan Akhtar is ready to be entertained by the role of Boxer | फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेतून मनोरंजन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या याबद्दल

फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेतून मनोरंजन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या याबद्दल

अभिनेता फरहान अख्तर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अभिनयासोबतच दिग्दर्शन, गायन व निर्मितीदेखील केली आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये त्याला यशदेखील मिळालं आहे. आता तो एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. यावेळेस तो बॉक्सिंग करताना दिसणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे तूफान. 

 

फरहान अख्तर तूफान चित्रपटात एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. फरहान पहिल्यांदाच बॉक्सरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी फरहान जीतोड मेहनत घेतो आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या वर्षाच्या सुरूवातीला फरहान अख्तर बॉक्सिंगच्या वेशात पहायला मिळाला होता. त्याच्या या लूकचे खूप कौतूक झाले होते.

फरहानने आतापर्यंत विविध भूमिका अगदी सहज साकारल्या आहेत. त्या भूमिकांतून त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. यावेळेस तो एका वेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर करताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. एक्सेल एण्टरटेन्मेंट प्रोडक्शनच्या या चित्रपटासाठी त्याने स्वतःत खूप बदल केला आहे.


तूफान चित्रपट 18 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

फरहान अख्तर शेवटचा द स्काय इज पिंक चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रा व झायरा वसीम मुख्य भूमिकेत होती.

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नव्हता. मात्र समीक्षकांनी या चित्रपटाला खूप चांगली दाद दिली होती.

Web Title: Farhan Akhtar is ready to be entertained by the role of Boxer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.