बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर त्याच्या घटस्फोटाच्या वृत्ताबाबत चुप्पी साधली होती. २ वर्षांपूर्वी फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी सर्वांना चकीत करून सोडले होते जेव्हा त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बरेच वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. फरहान मागचं सगळं विसरून पुढील आयुष्य आनंदात जगतो आहे. 


सध्या फरहान शिबानी दांडेकरला डेट करतो आहे. त्या दोघांच्या नात्याबद्दलचा खुलासा त्याने सोशल मीडियावर केला आहे. फरहान आतापर्यंत त्याच्या घटस्फोटाबद्दल बोलला नव्हता. मात्र आता त्याचा आगामी चित्रपट द स्काय इज पिंकच्या प्रमोशनदरम्यान त्याने पिंकव्हिलाशी बोलताना त्याबद्दल खुलासा केला.   


फरहानला जेव्हा विचारण्यात आलं की तुझ्या मुलांना घटस्फोट घेत असल्याचं सांगणं किती कठीण गेलं, त्यावर त्याने सांगितलं की, कोणतीच गोष्ट सोप्पी नव्हती. आपल्या मुलांना नाही ऐकायचंय त्या गोष्टी सांगणं शक्य नसते. ज्या गोष्टी आपली मुलांना आपल्याकडून अपेक्षित असतात आणि आपल्याकडून होत असल्याचं पहायचं असते. तुम्हाला समजतं की तुम्ही त्यांच्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा ठेवत आहात.


तो पुढे म्हणाला की, तुम्ही तुमच्या मुलांसोबत प्रामाणिक असू शकता का?, ते मूर्ख किंवा बेअक्कल नसतात. त्यांना बऱ्याच गोष्टी समजत असतात ज्याची आपण कल्पना करत असतो. त्यांना आपले आई वडील काय विचार करतात, हे बरोबर समजतं. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी खोटे बोलता आणि तुम्हाला वाटतं की सगळं ठिक आहे. मी माझ्या मुलांना सत्य सांगितले आणि त्यांना जे वाटतं ते करू शकतात.


शेवटी मुलांना समजतं की, तुम्ही जे केलं आहे ते का केलं आहे. कदाचित त्यांना ते लगेच कळणार नाही. पण तुम्हाला त्यांच्यासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. तर तेदेखील तुमच्यासोबत प्रामाणिक राहतील. 


सध्या फरहान आगामी चित्रपट तुफानचे काम करत आहे. या चित्रपटात तो बॉक्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Farhan Akhtar on how he broke news of his divorce to daughters: ‘They are not dumb or stupid’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.