फरहान अख्तरने ट्रोलकडे मागितला चक्क घराचा पत्ता, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 02:12 PM2021-04-28T14:12:52+5:302021-04-28T14:34:37+5:30

Farhan akhtar ask for troll address after his comment :सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे फरहान जबरदस्त चर्चेत आला आहे.

Farhan akhtar ask for troll address after his comment on covid 19 vaccine tweet | फरहान अख्तरने ट्रोलकडे मागितला चक्क घराचा पत्ता, म्हणाला...

फरहान अख्तरने ट्रोलकडे मागितला चक्क घराचा पत्ता, म्हणाला...

googlenewsNext

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते देशाशी आणि उद्योगाशी संबंधित मुद्द्यांबाबत तो आपलं मत स्पष्टपणे मांडत असतो. अलीकडे अशाच एका पोस्टमुळे फरहान जबरदस्त चर्चेत आला आहे. ज्यामुळे तो ट्रॉल्सच्या निशाण्यावर आला आहे, पण फरहाननेही या ट्रॉल्सला  उत्तर देत बोलती बंद केली आहे.  फरहानचे ट्विट कोरोना व्हायरससंबंधी होते.

 

ट्रोल्सचा घेतला क्लास 
फरहानने व्हॅक्सीनच्या वाढत्या किंमतीवर  प्रश्न केला होता, त्यानंतर तो ट्रॉल्सच्या निशाण्यावर आला होता. त्याचबरोबर लस दरवाढीबाबत सरकारची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर फरहानने पुन्हा एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने ट्रोल्सला उत्तर दिलं होतं. फरहानने या ट्विटमध्ये लिहिले- 'माझ्या प्रिय ट्रॉल्स. सरकार लस किंमतीत कपात करण्यासाठीही विचारत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व त्यांचेही टीएल अर्थव्यवस्थेविषयी व्याख्या देऊन भरुन टाकाला, जे तुम्ही मला देत आहात. तोपर्यंत मास्क लावा, घरीच रहा आणि आपले तोंड धुवा .. म्हणजे हात !! '

 

मला तुझा पत्ता दे ...
यानंतरही फरहानला ट्रोल करणं सुरुच होते. एका ट्रोलने लिहिले, 'तुझ्यासाठी करत आहेत, नाहीतर कोरोना पसरेल'. त्याच फरहानदेखील मागे हटला नाही आणि त्याने या ट्रोलचा पत्ता विचारला. ''पत्ता दे तुझा, मी एक नवीन विनोदी पुस्तक पाठवतो'. त्याचवेळी फरहानच्या या ट्विटवर त्याला चाहत्यांकडून जबरदस्त सपोर्ट मिळत आहे. बर्‍याच लोकांनी फरहानच्या ट्रोलचा क्लास घेतला आहे.


 

Web Title: Farhan akhtar ask for troll address after his comment on covid 19 vaccine tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.