ठळक मुद्देफरहान आणि शिबानी सध्या तरी लग्न करण्याचा विचार करत नसल्याची बातमी आली आहे. ते सध्या कपल म्हणूनच एकमेकांसोबत खूश असून त्यांनी त्यांच्या करियरकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे.

प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर गेल्या कित्येक महिन्यांपासून मॉडेल शिबानी दांडेकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिले जाते. सोशल मीडियावर देखील ते दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे हे कपल आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे म्हटले जात होते. या दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवातही झाली असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत होत्या. पण आता त्यांच्या लग्नाबाबत एक वेगळीच बातमी आली आहे.

फरहान आणि शिबानी सध्या तरी लग्न करण्याचा विचार करत नसल्याची बातमी नवभारत टाईम्सने दिली आहे. ते सध्या कपल म्हणूनच एकमेकांसोबत खूश असून त्यांनी त्यांच्या करियरकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या नात्याला ऑफिशियल करण्याची सध्या त्यांना गरज वाटत नाहीये. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. 

फरहानचे वडील जावेद अख्तर यांनी नुकतीच फराहन आणि शबानीच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, ''मला आता तुमच्याकडून फरहानच्या लग्नाबाबत कळले. फरहानच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याच्यासोबत होता. मात्र तो मला याविषयी काही बोलला नाही. तुम्हाला तर माहितीच आहे मुलं खूप काही लपवून ठेवतात.'' शिबानीबाबत बोलताना ते म्हणाले, ''मी अनेकवेळा तिला भेटलो आहे ती खूपच गोड मुलगी आहे.''

शिबानी ही प्रसिद्ध मॉडेल असून ती तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. टाइमपास’ या मराठी चित्रपटातील ‘ही पोरगी साजूक तुपातली’ या गाण्यात आपल्याला शिबानीला पाहायला मिळाले होते.

फरहान अख्तरने भाग मिल्खा भाग, दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, स्काय इज पिंक यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता त्याचा आगामी चित्रपट तुफान २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: ​Farhan Akhtar and Shibani Dandekar not in mood to marry soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.