ठळक मुद्देविवेक मुशरानने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याचा निरागस चेहरा आणि जबरदस्त अभिनयाने तो एका रात्रीत स्टार झाला.

सामान्य माणसांच्या आयुष्यात चढऊतार येतात. बॉलिवूडचे स्टार्सही याला अपवाद नाहीत. एका रात्रीत स्टार झालेले आणि यानंतर अचानक गायब झालेले येथे अनेक आहेत. आज यापैकीच काही स्टार्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, बदलत्या काळासोबत या अभिनेत्यांना ओळखणेही अशक्य झाले आहे. एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे हे स्टार्स आज अज्ञातवासात जगत आहेत.

फरदीन खान

फरदीन गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. एकेकाळी या चॉकलेटी हिरोवर तरूणी फिदा होत्या. आज बघाल तर त्याच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला आहे. मध्यंतरी त्याचे वजन इतके वाढले होते की, हाच फरदीन यावर अनेकांचा विश्वास बसला नव्हता. ‘प्रेम अगन’ या चित्रपटापासून  करियरची सुरुवात करणा-या फरदीनने जंगल, प्रायर तुने क्या किया, नो एंट्री, ओम जय जगदीश यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

उदय चोप्रा

 मोहब्बतें  या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा याची स्थितीही फरदीनपेक्षा वेगळी नाही. त्याच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला आहे. ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. मध्ये तो डिप्रेशनमध्ये गेल्याच्याही बातम्या आल्यात. यश चोप्राचा मुलगा व आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. २००० साली त्याने  ‘मोहब्बतें’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्याच्या रूपात पदार्पण केले. 

हरमन बावेजा

 २००९ मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी २०५०’ डेब्यू करणारा हरमन बावेजा त्याच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता.  लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू  ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून बाहेर फेकला गेला.   एकेकाळी सिक्स पॅक अ‍ॅब्सचा बादशाह असलेला हरमन आज पुरता बदलला आहे. ना कसलेले शरीर, ना सिक्स अ‍ॅब्स. अगदी अलीकडे पांढरे केस, वाढलेले वजन अशा रूपात तो दिसला होता. 

शादाब खान

अभिनेते अमजद खानचा मोठा मुलगा शादाब खान याने १९९७मध्ये राणी मुखर्जीसोबतचा चित्रपट ‘राजा की आएगी बारात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिलाच चित्रपट अयशस्वी ठरला. त्यानंतरदेखील शादाबने काही चित्रपटात काम केले. पण ते चित्रपट जास्त कमाल दाखवू शकले नाहीत. त्यानंतर शादाबने बॉलिवूडमधून निरोप घ्यायचे ठरविले.

   विवेक मुशरान

विवेक मुशरानने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याचा निरागस चेहरा आणि जबरदस्त अभिनयाने तो एका रात्रीत स्टार झाला. यानंतर त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली. पण एकवेळ अशीही आली की, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकेनासे झालेत आणि या हिरोवर साईड रोल करण्याची वेळ आली. ‘सौदागर’  सुपरहिट झाल्यानंतर विवेकने एका वर्षांत तीन-तीन चित्रपट केलेत. पण या चित्रपटांना ‘सौदागर’ सारखे यश मिळू शकले नाही आणि विवेकचे स्टारडम धोक्यात आले आणि यानंतर अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला.

 
 
 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fardeen khan to uday chopra 5 bollywood actors far from limelight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.