ठळक मुद्देलव्ह के लिए कुछ भी करेगा, ओम जय जगदीश, हे बेबी अशा अनेक सिनेमात फरदीनने काम केले.

बॉलिवूड स्टार किड्स इंडस्ट्रीत येणे आणि सुपरस्टार बनणे, हा प्रवास अनेकांना सोपा वाटतो. पण प्रत्यक्षात तसे नाही. बॉलिवूडमध्ये सहज एन्ट्री मिळणे, यापलीकडे प्रेक्षकांची मने जिंकण्याच्या दिव्यातून स्टार किड्सला जावे लागते. बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड एन्ट्री घेणारे अनेक स्टारकिड्स प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यात अपयशी ठरतात, ते म्हणूनच. असेच एक उदाहरण म्हणजे, सुपरस्टार फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान. आज फरदीनचा वाढदिवस.

फरदीनचा ग्रॅण्ड डेब्यू झाला. पण सुपरस्टार बनण्याची किमया मात्र त्याला साधता आली नाही. हळूहळू बॉलिवूडपासून तो दुरावा.  
1998 साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे फरदीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. फरदीनच्या वडिलांनी म्हणजे फिरोज खान यांनीच हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. अगदी पदार्पणालाच फरदीनच्या वाट्याला फ्लॉप सिनेमा आला. यानंतर यशाची चव चाखायला त्याला 2000 सालची वाट पाहावी लागली.होय, 2000 साली रिलीज झालेल्या ‘जंगल’ या सिनेमाने फरदीनला ओळख दिली. या चित्रपटातील फरदीनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. बॉक्सआॅफिसवरही हा सिनेमा हिट झाला. पण यानंतर 2001 साल उगवता उगवता फरदीन एका वादात सापडला.

होय, 2001 साली फरदीनला कोकेन खरेदी करताना रंगेहात पकडले गेले. यानंतर त्याला अटकही झाली. पाठोपाठ रिहॅब सेंटरमध्ये त्याची रवानगी झाली. या प्रकरणाने अनेक वर्षे फरदीनचा पाठपुरावा केला. अखेर 2012 साली त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली.

लव्ह के लिए कुछ भी करेगा, ओम जय जगदीश, हे बेबी, आॅल द बेस्ट अशा अनेक सिनेमात फरदीनने काम केले. पण अचानक का कुणास ठाऊक त्याने चित्रपटांतून बे्रेक घेतला. यानंतर अनेक वर्षे तो बॉलिवूडमधून गायब झाला. यानंतर तो पुन्हा दिसला तेव्हा लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. होय, वाढलेल्या वजनामुळे त्याला ओळखताही येईना.

फरदीन खान सध्या काय करतो, तर आपल्या वडिलांचा कोट्यवधी रूपयांचा व्याप सांभाळतो. फिरोज खान यांनी बेंगळुरूमध्ये शंभर एकरापेक्षा अधिक जमिन खरेदी केली होती. याठिकाणी त्यांचे एक फार्महाऊस आहे. या जमिनीवर लोकांसाठी अलिशान घरे बनवण्याची फिरोज खान यांची योजना होती. फिरोज खान ही योजना अमलात आणू शकले नाहीत. पण फरदीन खानने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले. काही वर्षांपूर्वी गोदरेज प्रॉपर्टीजसोबत मिळून फरदीनने एक मोठी डील साईन केली होती.

फरदीनचे लग्न त्याची बालपणीची मैत्रिण नताशा माधवानीसोबत झालेय. त्यांना दोन मुले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fardeen khan birthday special he stay away from lime light till 8 years-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.