सुशांत सिंग रजपूतच्या वाढदिवसासाठी चाहते करतायेत तयारी, अशाप्रकारे आठवणींना देतायेत उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 03:10 PM2021-01-20T15:10:25+5:302021-01-20T15:11:31+5:30

छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला होता.

Fans trend 'One day for SSR birthday' ahead of Sushant Singh Rajput's first birth anniversary | सुशांत सिंग रजपूतच्या वाढदिवसासाठी चाहते करतायेत तयारी, अशाप्रकारे आठवणींना देतायेत उजाळा

सुशांत सिंग रजपूतच्या वाढदिवसासाठी चाहते करतायेत तयारी, अशाप्रकारे आठवणींना देतायेत उजाळा

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्सने त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचे ठरवले आहे. सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो शेअर केले जात आहेत.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतचा उद्या वाढदिवस आहे. त्याच्या निधनानंतर त्याचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्सने त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचे ठरवले आहे. सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो शेअर केले जात आहेत. तसेच त्याचे विचार सोशल मीडियावर शेअर करून तो किती हुशार होता हे त्याचे फॅन्स सगळ्यांना सांगत आहेत. तसेच त्याच्या अनेक जुन्या मुलाखती देखील ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याच्या कुटुंबियांसोबतचे त्याचे फोटो शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

एकाने ट्विटरवर लिहिले आहे की, लोकांसोबत चांगल्याप्रकारे वागणे, त्यांचा आदर करणे यालाच चांगले आयुष्य व्यतीत करणे असं म्हणतात तर एकाने सुशांतच्या वाढदिवसासाठी केवळ एकच दिवस शिल्लक आहे असे लिहिले आहे. सुशांतच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीपासूनच सोशल मीडियावर सुशांत रजपूत हे नाव ट्रेंड होत आहे.

छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. सुशांत सिंग राजपूतने १४ जून, २०२० ला वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातल्यांनी आणि चाहत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

पवित्र रिश्ता या मालिकेनंतर काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुशांतने अनेक हिट चित्रपट दिले. धोनीच्या बायोपिकमधील त्याच्या भूमिकेचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं. केदारनाथ या चित्रपटातील त्याचे काम देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. 

Web Title: Fans trend 'One day for SSR birthday' ahead of Sushant Singh Rajput's first birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.