अनुष्का शर्मा या दिवसांत तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. प्रेग्नंसी दरम्यान ती विश्रांती कमी आणि कामच जास्त करताना दिसत आहे. कामाबरोबरच ती तिची योग्य काळजीही घेत आहे. ती नियमितपणे योगा करते आणि या कामात  विराट कोहलीला तिला मदत करतो. अशा परिस्थितीत या दोघांचा एका फोटोने मात्र चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. हा फोटो पाहून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.

फोटो अनुष्का खाली डोकं वर पाय योगा करताना दिसत आहे.सोशल मीडियावर अनुष्का आणि विराटचा फोटो व्हायरल होताना पाहून लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत आणि इतरांना सुचवित आहेत की त्यांनी अशा प्रकारचे योगा करणे कितपत योग्य आहे? फिटनेस ट्रेनरकडूनच प्रेग्नंसीमध्ये योगा करण्याचा सल्ला तिला काहीजण करत आहेत. 

एकाने लिहिले, 'हे खूप धोकादायक आहे. कृपया कोणत्याही ट्रेनिंगशिवाय घरात अशा नाजुक अवस्थेत योगा करू नका.  'त्याचवेळी दुसर्‍याने लिहिले की, 'जर आमच्या आजीने हा योगा  पाहिला असता ना विराट कोहलीची चांगलीच शाळा घेतली असती.

 

योगा हा आरोग्यासाठी चांगला आहे परंतु गर्भधारणेदरम्यान हे करणे योग्य नसावे. यापूर्वीसुद्धा अनुष्काला सोशल मीडिया स्वतःची योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले होते. खरं तर, शूटच्या वेळी ती खूप वेगाने चालत होती.त्यामुळे हळु चालण्यास सांगितले होते. 


अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आपली गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून सोशल मीडियावर केवळ या जोडप्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. गुड न्यूज जाहीर केल्यापासून ते आतापर्यंत अनुष्का आपले स्टायलिश आणि मोहक अवतार चाहत्यांना पाहायला मिळतोय. पोलका डॉच फ्रिल ड्रेसपासून ते डंगरीपर्यंत अनुष्काच्या वॉर्डरोब एकापेक्षा एक सुंदर फॅशनेबल मॅटर्निटी ड्रेस पाहायला मिळत आहेत.


VIDEO: लाखो मराठी तरुण तरुणींना विचारतात; तोच प्रश्न विराट अनुष्काला विचारतो तेव्हा

 जेवलीस का..? याच प्रश्नामुळे अनेक मुलांचा संवाद सुरू होता. याच प्रश्नामुळे काहींचं जुळतंदेखील. या प्रश्न तसा फारसा टाळता नाही. याशिवाय या प्रश्नात काळजीदेखील आहे. त्यामुळे या प्रश्नामुळे संवादाची गाडी पुढे सरकण्याची शक्यताही जास्त असते. लाखो मराठी तरुण तरुणींना विचारत असलेला हाच प्रश्न आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीनं त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला विचारला आहे. तोही थेट अगदी मैदानावरून.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fans started trolling Anushka Sharma and Virat Kohli Latest Yoga Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.