गेल्या काही दिवसांपासून बाहुबली स्टार अनुष्का शेट्टी चर्चेत नव्हती. बाहुबली सिनेमात देवसेनेच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी अचानक गायब झाली .  मात्र मध्यंतरीच्या काळात अनुष्का अमेरिकेत 'तेलगू' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे ती प्रसिद्धी माध्यमांपासून लांबच होती. तिच्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा होत नव्हती. सोशल मीडियावरही ती फारशी अॅक्टीव्ह नसते. त्यामुळे तिच्या आयुष्यातील खास गोष्टी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते हे अधिक उत्सुक असतात. नुकतीच अनुष्का एअरपोर्टवर स्पॉट झाली. मात्र अनुष्काला पाहताच तिच्या आजूबाजूला असणारे लोक संभ्रमात असल्याचे पाहायला मिळाले.


 हीच ती बाहुबली फेम अनुष्का शेट्टी का? असा प्रश्न यावेळी प्रत्येकाला पडला होता, नेमके असे काय झाले की, अनुष्काला यावेळी कोणीच ओळखु शकत नव्हते. तिचे अचानक वाढलेले वजनामुळे ती खूप लठ्ठ दिसते. एरव्ही तिचा प्रत्येअक अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करायचा मात्र यावेळी तिला पाहताच तिच्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.  ग्लॅमरस अंदाजात दिसणारी अनुष्काचे इतकी लठ्ठ दिसत असली तरी  ती सुंदर दिसत असल्याच्याही चाहत्यांना प्रतिक्रीया दिल्या आहेत. कदाचित सिनेमासाठी तिने तिचे वजन वाढवले असावे आणि त्यामुळे ती आता अशी दिसत असावी अशाही शक्यता वर्तवली जात आहे.  विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीत करियरला सुरूवात करण्यापूर्वी अनुष्का योगा इंस्ट्रक्टर म्हणून काम करत होती. त्यामुळे योगाच्या मदतीने ती पुन्हा पूर्वी प्रमाणे ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळणार हे मात्र नक्की. 


अनुष्काचं सौंदर्य पाहून तिला एका दिग्दर्शकाने चित्रपटाची ऑफर दिली होती. अनुष्काने २००५ साली तेलुगू चित्रपट 'सुपर'मधून पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व आयशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तिची सपोर्टिंग भूमिका होती. यातील तिच्या कामाचं खूप कौतूक झालं होतं. 


Web Title: Fans Shocked To See Fat Plump Anuska Shetty Photo Viral On Social Media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.