एवढी श्रीमंत असून काय फायदा, वृध्द व्यक्तीला मदत न केल्यामुळे श्रद्धा कपूरवर भडकले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 02:15 PM2021-09-11T14:15:31+5:302021-09-11T14:19:44+5:30

श्रद्धा कपूर एका सिनेमासाठी तीन ते चार कोटी इतके मानधन घेते. श्रद्धा कपूर हीची एकूण संपत्ती ५७ करोड रुपये इतकी असल्याचे बोलले जाते.महागड्या गाड्यांचेही कलेक्शन तिच्याकडे आहे.

Fans scream on Shraddha Kapoor, says whats the use of being so rich if she can't help the old man | एवढी श्रीमंत असून काय फायदा, वृध्द व्यक्तीला मदत न केल्यामुळे श्रद्धा कपूरवर भडकले चाहते

एवढी श्रीमंत असून काय फायदा, वृध्द व्यक्तीला मदत न केल्यामुळे श्रद्धा कपूरवर भडकले चाहते

Next

आजवर विविध प्रकारच्या आव्हानात्मक भूमिका साकारत श्रद्धा कपूरने इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. रोमँटिक असो किंवा मग एखादी हटके भूमिका. तिला  पुरेपूर न्याय दिला त्यामुळेच चाहत्यांची ती आवडती अभिनेत्री बनली.सध्या सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.  मुळात सेलिब्रेटी अनेकदा सामाजिक कार्य करत इतरांनाही प्रेरणा देत असतात. सकारात्मकतेचा संदेश देत असतात. एकमेकांना मदत करा असे आवाहनही करताना दिसतात. कोरोना काळात तर जवळपास सगळेच सेलिब्रेटींनी पुढे येत गरिबांची मदत करताना दिसले. मात्र आता श्रद्धाच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. 

श्रद्धाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. समोर आलेल्या व्हिडीओत श्रद्धा तिच्या मित्र- मैत्रींसोबत मजा मस्ती करताना दिसतेय. तितक्यात एक वृद्ध तिच्याजवळ येतात.  मदतीसाठी तिला ते विचारतात. मात्र त्यांची मदत न करता श्रद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा मित्रांसोबत गप्पा मारण्यात बिझी होती. तिचे असे वागणे पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

''करोडोंची कमाई करतात दोन पैस्यांची मदत गरिबाला करु शकत नाही, तर काय फायदा त्या श्रीमंतीचा''. ''एरव्ही तर बड्या बड्या बाता करत मदत करताना दिसतात. ते सगळे खोटं वागणं आता तरी बंद करा, जे दिसतंय तेच खरे सेलिब्रेटींची रिएलिटी आहे''. ''जो गरिबांना मदत करतो तोच खरा हिरो''. अशा कमेंट्स सध्या तिच्या या व्हिडीओवर उटमत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून श्रद्धावर सारेच नाराजी व्यक्त करताना दिसतायेत.एरव्ही रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव होणारऱ्या  श्रद्धावर मात्र चाहते प्रचंड टीका करत असल्याचे पाहायला मिळतंय.


श्रद्धा कपूर एका सिनेमासाठी तीन ते चार कोटी इतके मानधन घेते. श्रद्धा कपूर हीची एकूण संपत्ती ५७ करोड रुपये इतकी असल्याचे बोलले जाते.महागड्या गाड्यांचेही कलेक्शन तिच्याकडे आहे. शक्ती कपूरची मुलगी असणारी श्रद्धा आलिशान आयुष्य जगते.गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा तिच्या सिनेमांपेक्षा कमी रिलेशशिपमुळेच जास्त चर्चेत आहे. श्रद्धा फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला डेट करत असून लवकरच दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर मात्र अजूनतरी श्रद्धाकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही. 

Web Title: Fans scream on Shraddha Kapoor, says whats the use of being so rich if she can't help the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app