'द फॅमिली मॅन २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार, या दिवशी रिलीज होणार वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:16 PM2021-05-05T20:16:30+5:302021-05-05T20:17:10+5:30

मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Fans of 'The Family Man 2' will have to wait for the release of this web series | 'द फॅमिली मॅन २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार, या दिवशी रिलीज होणार वेबसीरिज

'द फॅमिली मॅन २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार, या दिवशी रिलीज होणार वेबसीरिज

Next

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरिजला सप्टेंबरमध्ये एक वर्षं पूर्ण झाल्यानंतर द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची दमदार अंदाजात घोषणा केली होती. 'द फॅमिली मॅन'चा पुढील भाग याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

'द फॅमिली मॅन'चा यावर्षी जानेवारीत टीजर लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून ही वेबसीरिजच्या रिलीजची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'तांडव' ही वेबसिरीज रिलीज करण्याच्यावेळी जे वादंग झाले, त्यामुळे 'द फॅमिली मॅन २′च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता या वेबसिरीजचा नवीन सीझन याच उन्हाळ्यात प्रेक्षकांना बघायला मिळेल, असे निर्मात्यांनी घोषित केले आहे. या जूनमध्ये हा नवीन सीझन अॅमेझोन प्राईमवर रिलीज होण्याची शक्‍यता आहे.


दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री समांथा अक्किनेनीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसिरिजच्या निमित्ताने ती डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे.  'द फॅमिली मॅन 2′ चा टीजर बघितल्यावर मनोज वाजपेयीचा बदललेला अंदाज लक्षात येतो. मुसा जिवंत आहे की मेला, याचा उलगडा या नव्या सीझनमध्ये होईल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fans of 'The Family Man 2' will have to wait for the release of this web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app