fan reached guwahati to meet salman khan after cycling over 600 kms | चाहता असावा तर असा! 600 किमी सायकल चालवत भाईजानला भेटायला पोहोचला भूपेन

चाहता असावा तर असा! 600 किमी सायकल चालवत भाईजानला भेटायला पोहोचला भूपेन

ठळक मुद्देसलमानचा हा कट्टर चाहता 52 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे, त्याच्या नावावर एक विक्रमही आहे.

बॉलिवूड स्टार्सचे फॅन्स आणि त्यांच्या अजब-गजब कथा आपण रोज ऐकतोय. आपल्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कुठल्या दिव्यातून जातील याचा नेम नाही. आता भाईजान सलमान खानच्या या चाहत्याचेच बघा ना. या चाहत्याने काय केले तर तब्बल 600 किमी सायकल चालवत तो भाईजानच्या भेटीला पोहोचला. अद्याप सलमान व त्याची भेट होऊ शकली नाही. पण भाईजान आपल्याला नक्की भेटेल, हा पक्का विश्वास त्याला आहे.
सलमानच्या या डाय हार्ड फॅनचे नाव आहे भूपेन लिकसन. तो आसामच्या तिनसुकिया येथे राहणारा आहे. यावर्षी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुवाहाटी येथे होणार आहे आणि सलमान खानही या सोहळ्याला हजर राहणार आहे, हे भूपेनला कळले आणि त्याने सलमानला भेटायचेच या ध्यासाने गुवाहाटी गाठले. ते सुद्धा सायकलने 600 किमीचे अंतर पार करून.

सलमानचा हा कट्टर चाहता 52 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे, त्याच्या नावावर एक विक्रमही आहे.

होय, 2013 मध्ये  त्याने सायकलच्या हँडलला हात न लावता 60 मिनिटांत 48 किलोमीटर सायकल चालवली होती. यासाठी त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. आता भूपेन सलमानच्या भेटीची प्रतीक्षा करतोय. ही भेट कधी होते, कशी होते, ते बघूच.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘राधे’ या सिनेमात बिझी आहे. फरहाद समाजी दिग्दर्शित ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातही सलमान दिसणार आहे. हा चित्रपट 2021 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fan reached guwahati to meet salman khan after cycling over 600 kms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.