fan asked to shahid kapoor how to happy wife for 21 days actor replied-ram | 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल? शाहिद कपूरचे उत्तर वाचा

21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल? शाहिद कपूरचे उत्तर वाचा

ठळक मुद्देतूर्तास कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड ठप्प पडले आहे.

पीएम मोदींच्या घोषणेनंतर आजपासून 14 एप्रिलपर्यंत देशात संपूर्ण लॉकडाऊन आहे.  सामान्यांसह सेलिब्रिटींनीही मोदींच्या या घोषणेचे स्वागत केले असून त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देण्याची विनंती केली आहे. घरातून बाहेर पडू नका़ घरात राहा, अशी विनंती बॉलिवूडचे अनेक स्टार्स करताना दिसताहेत. शाहिद कपूरनेही आपल्या चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. पण यानंतर एका चाहत्याने शाहिदला एक मजेशीर प्रश्न विचारला आणि शाहिदनेही या प्रश्नाला तेवढेच मजेशीर उत्तर दिले.
होय, 21 दिवसांच्या लॉक डाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवायचे? असा प्रश्न या चाहत्याने शाहिदला केला. यावर शाहिदने काय उत्तर दिले माहितीये? तर वाचा...


‘आदरपूर्वक सेवा करो... बॉस बॉस होता है...,’असे शाहिदने या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना लिहिले.
सध्या अन्य बॉलिवूड स्टार्सप्रमाणे शाहिदही घरात आहे. अर्थात याऊपरही तो सतत चर्चेत आहे. होय, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वी शाहिदने पत्नी मीरा राजपूतसोबत घरात वर्कआऊट करत असतानाचे फोटो शेअर केले होते.


शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा आगामी सिनेमा ‘जर्सी’ आहे. लॉक डाऊन संपल्यानंतर आणि कोरोनाचे संकट निवळल्यानंतर या चित्रपटाचे शूटींग पुन्हा एकदा सुरु होईल. याआधी आलेला शाहिदचा कबीर सिंग हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी लीड रोलमध्ये दिसली होती.
तूर्तास कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड ठप्प पडले आहे. अनेक चित्रपटांचे शूटींग थांबले आहे.

Web Title: fan asked to shahid kapoor how to happy wife for 21 days actor replied-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.