नेटफ्लिक्सवरील आगामी रिएलिटी शो फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ज खूप चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या प्रसिद्ध पत्नींच्या जीवनाची झलक दाखवण्यात येणार आहे. या शोचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

यात संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी आणि अभिनेत्री नीलम कोठारी पहायला मिळणार आहे. या शोमध्ये या चौघींच्या जीवनाची एक झलक पहायला मिळणार आहे की त्या कशा पद्धतीने लाइफ जगतात. 


महीप कपूर ही संजय कपूरची पत्नी आहे. म्हणजेच अनिल कपूर आणि बोनी कपूरची वहिणी आहे. महीप बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरची काकी आहे. महीप आणि संजय कपूरचे लग्न २० वर्षापूर्वी झाले होते. या दोघांना दोन मुले आहेत शनाया आणि जहान. महीप १९९४ साली एक शॉर्ट फिल्म निगौडी कैसी जवानीमध्ये झळकली आहे.

नीलम कोठारी सोनीने १९८४ साली चित्रपट जवानीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने बऱ्याच सिनेमात काम केले जसे की हत्या, इल्जाम, सिंदूर, कुछ कुछ होता है. समीर सोनीसोबत नीलमचे हे दुसरे लग्न आहे. दोघांच्या लग्नाला ९ वर्षे झाले आहेत. दोघांना एक मुलगीदेखील आहे जिला त्यांनी दत्तक घेतले आहे. जिचे नावा अहाना आहे.

सीमा खान बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची पत्नी आहे. सीमा सलमान आणि अरबाजची वहिणी आहे. सीमा एक फॅशन डिझायनर आहे. सीमा आणि सोहेलला दोन मुले आहेत निर्वाण आणि योहान. सीमा आणि सोहेलने २७ मार्च, १९९८ साली लग्न केले होते. हा दिवस सोहेलसाठी खास होता कारण त्यादिवशी त्याचा प्यार किया तो डरना क्या हा चित्रपट रिलीज झाला होता.

भावना पांडे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची पत्नी आहे. दोघांनी १९९८ साली लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला २२ वर्ष झाली आहेत. भावना आणि चंकीला दोन मुली आहेत अनन्या आणि ऱ्यासा. अनन्या अभिनेत्री आहे. भावना एक फॅशन डिझायनर आहे. याशिवाय तिचे आणि चंकीचे मुंबईत फूड रेस्टॉरंटदेखील आहे.

फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ज हा शो आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Fabulous Lives of Bollywood Wives' show is being discussed everywhere, find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.