'Everyone is an actor and is acting', Sushant had said to Siddharth 'Mann Ki Baat' | 'सगळे अ‍ॅक्टर आहेत आणि अ‍ॅक्टिंग करताहेत', सुशांतने सिद्धार्थशी केली होती 'मन की बात'

'सगळे अ‍ॅक्टर आहेत आणि अ‍ॅक्टिंग करताहेत', सुशांतने सिद्धार्थशी केली होती 'मन की बात'

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या 34व्या वर्षात जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनामुळे फक्त त्याचे कुटुंबच नाही तर त्याचे चाहते खूप दुखावले गेले आहेत. सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सुशांतचे वडील के के सिंग यांनी पाटणामध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. यादरम्यान आता सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिटानी याने नवीन खुलासा केला आहे.

सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिटानी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येतो आहे. सिद्धार्थने नुकतेच सुशांत सिंग राजपूतबद्दल काही नवीन खुलासे केले आहेत. सुशांत जानेवारी महिन्यापासूनच कोलमडून गेला होता. सिद्धार्थ पिटानीने नुकतेच झुमला मुलाखतीत सांगितले की, सुशांतने त्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फोन केला होता आणि म्हणाला होता की, प्लीज परत ये. मला वाटतं की आपण एकत्र मिळून काहीतरी करू शकतो. आता मला एक्टिंग करायची नाही. आपण मिळून व्हर्चुअल रिएलिटी किंवा दुसऱ्या फिल्डवर काही काम सुरू करू शकतो. त्यासाठी तू अगदी योग्य व्यक्ती आहेस आणि यावर माझा ठाम विश्वास आहे. तू तुझी नोकरी सोड, मी तुला तेवढी सॅलरी देईन.

सिद्धार्थने पुढे सांगितले की, सुशांतचे ऐकून मी माझे सगळे सामान पॅक केले आणि माझे अपार्टमेंट सोडून त्याच्याकडे गेलो. जेव्हा मी त्याच्याकडे गेलो तेव्हा तो खूप दुःखी होता. मला सुशांत रडत म्हणाला की, माझ्याजवळ आता कुणीच नाही. मला आता साधे आयुष्य जगायचे आहे. सुशांत एक्टिंग करायची नव्हती. तो रस्त्यावरील गर्दीमुळे त्रस्त झाला होता. सिद्धार्थ म्हणाला की, सुशांत भावूक होऊन म्हणाला होता की हे सगळे एक्टर आहेत आणि ते सगळे एक्टिंग करत आहेत.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Everyone is an actor and is acting', Sushant had said to Siddharth 'Mann Ki Baat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.