इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने 'जन्नत २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती इमरान हाश्मीच्या अपोझिट दिसली होती. सोशल मीडियावर ती अ‍ॅक्टिव्ह असते. ईशा नेहमी सोशल मीडियावर ड्रेसिंग सेन्स व हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. नुकतेच ईशाने सोशल मीडियावर तिचे नवं फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसते आहे. ईशाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. फॅन्सनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंसचा वर्षाव केला आहे.   


 ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते. २००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 


ईशा बॉलिवूडमध्ये 'बेबी', 'रुस्तम' व 'बादशाहो', कमांडो, चक्रव्यूह सारख्या चित्रपटात झळकली आहे.शेवटची ईशा 'टोटल धमाल' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, अनिल कपूर व माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.

बॉक्स ऑफिसवर या सिनेमा चांगला गल्ला जमावला होता. लवकरच ईशा देसी मॅजिक सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन मेहुल अथाने केले आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Esha gupta share hot photoshoot on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.