emraan hashmi big statement about bollywood | बॉलिवूडमधील लोकांशी मी कामाशी काम ठेवतो...! इमरान हाश्मी असे काही बोलला की चर्चा तर होणारच!!

बॉलिवूडमधील लोकांशी मी कामाशी काम ठेवतो...! इमरान हाश्मी असे काही बोलला की चर्चा तर होणारच!!

ठळक मुद्देइमरान हाशमीचा ‘चेहरे’ हा चित्रपट 30 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

बॉलिवूडमध्ये अभिनेता  इमरान हाश्मी सध्या त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. होय, बॉलिवूडमध्ये इमरान असा काही बोलून गेला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. बॉलिवूडचा उल्लेख त्याने ‘बनावट’ असा केला. बॉलिवूड पार्ट्यांना, इव्हेंटला हजर न राहण्यामागचे कारणही त्याने सांगितले.
इमरानने रेडिओ होस्ट सिद्धार्थ खन्नाला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत इमरान बॉलिवूडबद्दल जे काही बोलला ते ऐकून सगळेच हैराण झालेत.

‘काम पूर्ण झाल्यानंतर मी बॉलिवूडच्या ग्लॅमर आणि झगमगाटापासून दूर राहणे पसंत करतो. खूप आधीपासून मी स्वत:ला हा नियम घालून दिला आहे. मनापासून काम करणे आणि कामाशी काम ठेवणे, हे माझे तत्त्व आहे. मी मनापासून काम करतो. अगदी जीव ओतून माझ्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. बॉलिवूडमधील लोक नेहमीच तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतात, परंतु तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात. त्यामुळे बॉलीवूडमध्ये कोण बरोबर आणि कोण चुकीचे? हे शोधणे फार कठीण आहे.
 बॉलिवूडमधील लोकांशी मी कामाशी काम ठेवतो. फक्त माझ्या जुन्या मित्रांमध्येच मला सुरक्षित वाटते, असे तो म्हणाला.

इमरान हाशमीचा ‘चेहरे’ हा चित्रपट 30 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट एका गूढ कथेवर आधारित असून या चित्रपटात इमरान आणि अमिताभ यांच्यासोबतच अन्नू कपूर, रघुवीर यादव यांच्यासारखे दिग्गज कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: emraan hashmi big statement about bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.