ठळक मुद्देएली ही सलमानची आवडती अभिनेत्री आहे. कधीकाळी सलमान व एलीच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. पुढे क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतही तिचे नाव जोडले गेले होते.

लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचे सगळेच स्टार्स घरात अडकून पडले आहेत. आता सलमान खानची आवडती एली अवरामचेच घ्या ना, गेल्या दोन महिन्यांपासून एली घरातून बाहेर पडलेली नाही. आता इतका फावला वेळ म्हटल्यानंतर काही तर उचापती व्हायलाच हव्या ना. एलीने काय केले तर बीटरूटचा मास्कचा तयार केला. केवळ चेह-यावर नाही तर अख्च्या शरीरावर तिने हा मास्क लावला. हा मास्क लावल्यानंतरचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. सोबत मजेशीर कॅप्शनही.

‘बीटरूट की दुकाऩ़. आधी बीटरूटचा मास्क मी केवळ चेह-याला लावला होता. माझी होम स्टाफ उषाने संपूर्ण शरीरावर लावण्याचा सल्ना दिला. मग काय, यानंतर उषाने मला एलियनची उपमा दिली,’ असे तिने लिहिले.
बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम नेहमी पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.   सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या एलीने काही दिवसांपूर्वी  विचित्र फोटो शेअर केले होते.

होय, एली अवरामने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत एली अवराम टॉयलेटमध्ये फोनवर बोलताना दिसली होती.  एली अवरामचे हे विचित्र फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 अभिनेत्री एली अवराम  चित्रपटात येण्याअगोदर ‘बिग बॉस’च्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ अशा अनेक चित्रपटात झळकली.
अलीकडे ती ‘मलंग’ या सिनेमात झळकली होती. यात तिने एका विदेशी महिलेची भूमिका साकारली होती.

एली ही सलमानची आवडती अभिनेत्री आहे. कधीकाळी सलमान व एलीच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. पुढे क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतही तिचे नाव जोडले गेले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: elli avrram takes beetroot spa at home-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.