Elakshi Gupta debut in bollywood, She will be seen in Tanaji Movie | 'तानाजी' चित्रपटात झळकणार नवा चेहरा, बॉलिवूडमध्ये 'ही' अभिनेत्री करतेय एन्ट्री

'तानाजी' चित्रपटात झळकणार नवा चेहरा, बॉलिवूडमध्ये 'ही' अभिनेत्री करतेय एन्ट्री

बॉलिवूडमध्ये एकीकडे स्टारकिड्सची चलती असून काही नवीन चेहरेदेखील पहायला मिळत आहेत. त्यात आता डॉक्टर, सुपरमॉडेल व अभिनेत्री इलाक्षी गुप्ता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती अजय देवगणचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपट तानाजीमध्ये झळकणार आहे. 

इलाक्षी गुप्ता तानाजी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटात शिवाजी महाराजांची पत्नी सोयराबाई मोहिते याची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर दिसणार आहे.

इलाक्षीचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. इलाक्षी अजय देवगण, काजोल, सैफ अली खान व शरद केळकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 


यापूर्वी इलाक्षीने प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

इलाक्षीने २०१५ साली मिसेस इंडिया ग्लोब ही पदवी मिळवली होती. तानाजी नंतर लवकरच इलाक्षी मराठी चित्रपटात पदार्पण करताना दिसणार आहे.  तानाजी १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Elakshi Gupta debut in bollywood, She will be seen in Tanaji Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.