Ekta Kapoor Ki, who was so angry with the brother that the phone was done directly to the police! | भावावर इतकी संतापली होती एकता कपूर की, थेट पोलिसांना केला होता फोन!
भावावर इतकी संतापली होती एकता कपूर की, थेट पोलिसांना केला होता फोन!

ठळक मुद्देएकता, तुषार यांच्यासोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये मल्लिका शेरावतही दिसली. ‘बू सबकी फटेगी’ या हॉरर कॉमेडी वेब सीरिजचे प्रमोशन करताना ते दिसले.

टीव्हीची क्वीन एकता कपूर आणि तिचा भाऊ तुषार कपूर यांचे नाते कसे असावे? तर प्रत्येक घरात बहीण-भावाचे असते तसे. एकता व तुषार यांची एकमेकांवर जितकी माया आहे, तितकेच तो दोघे एकमेकांशी भांडतात.एकदा तर दोघांत इतके कडाक्याचे भांडण झाले की, एकताने थेट पोलिसांना फोन केला होता. होय, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुद्द एकताने हा खुलासा केला.
एकता व तुषारने अलीकडे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी एकताने अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या. तुषारसोबतच्या नात्याबद्दलही ती बोलली. 

 तिने सांगितले की, ‘प्रत्येक घरात भाऊ-बहीण भांडतात. आम्हीही तसेच भांडतो. एकदा आम्ही फॅमिली ट्रिपवर तिरूपतीला गेलो होतो. यादरम्यान तुषार व माझ्यात कुठल्याशा कारणावरून वाद झाला. भांडणात तुषारने माझ्या नाकावर जोरदार पंच मारला. मला इतका राग आला की, मी थेट पोलिसांना फोन केला होता. तेव्हापासून फॅमिली ट्रिप म्हटले की, आम्ही दोघेही कधीच एका कारमध्ये जात नाही. कारण आम्ही एकत्र आलो की, आमच्यात भांडण झालेच म्हणून समजा.’


तुषारनेही भांडणाचा एक किस्सा ऐकवला. त्याने सांगितले की, ‘आम्ही शाळेत जायचो, तेव्हाही अगदी एकमेकांचे कॉलर फाडण्यापर्यंत आम्ही भांडायचो. अनेकदा रस्त्यात आम्ही भांडायचो. मग कपडे बदलण्यासाठी घरी जावे लागायचे आणि शाळेला उशीर व्हायचा. ’


एकता, तुषार यांच्यासोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये मल्लिका शेरावतही दिसली. ‘बू सबकी फटेगी’ या हॉरर कॉमेडी वेब सीरिजचे प्रमोशन करताना ते दिसले. या वेबसीरिजमध्ये तुषार कपूर, मल्लिका शेरावत यांच्याशिवाय ‘द कपिल शर्मा शो’चे कलाकार कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.


Web Title: Ekta Kapoor Ki, who was so angry with the brother that the phone was done directly to the police!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.