गेल्या काही दिवसांपासून महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या फोटोंमुळे नेटीझन्समध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. कमी वयाच्या मुलींबरोबर महेश भट्ट यांची जवळीक का असते? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवार राहणार नाही. कारण फक्त रिया चक्रवर्तीच नाहीतर इतरही अभिनेत्रींबरोबर महेश भट्टची मैत्री असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


धक्कादायक बाब म्हणजे सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर रिया महेश भट्ट यांच्या संपर्कात होती. रिया सुशांतबद्दल महेश भट यांच्याकडून सल्ला घेत होती. तसंच संपूर्ण वर्षभरामध्ये रियाने १६ वेळा महेश भट्ट यांना फोन केला होता. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर रिया आणि महेश भट्ट यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एवढचं नाही तर रिया तिच्या रिलेशनशिप संबंधीत सल्ले देखील महेश भट्ट यांच्याकडून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तिच्या प्रत्येक निर्णयात महेश भट्ट हस्तक्षेप करत असायचे. सुशांत आणि रिया रिलेशनशीपमध्ये होते. सुशांतच्या आत्महत्येच्या दोन महिन्यापूर्वी पासून त्यांच्यात मतभेद सुरू असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. 

 

बॉलिवूडमध्ये यशस्वी व्हायचे  असेल तर गॉडफादर शिवाय पर्याय नाही याची जाण रियाला होतीच. यशाची पायरी चढताना रियाला महेश भट्ट यांनी मदत केली. म्हणून महेश भट्ट यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत रियाने महेश भट्ट यांच्यासह क्लिक केलेला फोटो शेअर करत म्हटले होते की, ''आपल्याला करिअरमध्ये त्यांनी योग्य दिशा दाखवली, योग्य मार्गदर्शन केले'' असे सांगत रियाने त्यांचे पोस्टद्वारे आभार मानले. त्यांच्या फोटोसोबतच तिने भावूक संदेशसुद्धा लिहिला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: During the year, Riya called Mahesh Bhatt so many times, constantly asking questions On this Topic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.