ठळक मुद्देअक्षय आणि रवीना एकमेकांसोबत स्टेज शेअर करायला कर्म्फटेबल नाहीयेत. नच बलिये या कार्यक्रमाच्या या सिझनची परीक्षक रवीना आहे हे कळल्यानंतर अक्षयने या कार्यक्रमाचा हिस्सा व्हायला नकार दिला.

अक्षय कुमार आणि रवीना टंडन हे एकेकाळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मोहरा या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले टीप टीप बरसा पाणी हे गाणे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांच्या अफेअरच्या सुरुवात झाली असे म्हटले जाते. त्या चित्रपटानंतर त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येत असे. त्या दोघांची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडायची. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांचे ब्रेकअप झाले. 

आज रवीना आणि अक्षय दोघेही आपापल्या आयुष्यात खूप पुढे गेले असून रवीनाचे लग्न प्रसिद्ध फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसोबत तर अक्षयचे लग्न अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत झाले आहे. ते दोघे आयुष्यात पुढे गेले असले तरी ते आपला भूतकाळ विसरले नाहीयेत असेच म्हणावे लागेल. कारण रवीनाला टाळण्यासाठी अक्षयने नच बलियेमध्ये येण्यास नकार दिला असे म्हटले जात आहे.

मिशन मंगल हा अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे अक्षय जोरदार प्रमोशन करत असून या चित्रपटाच्या निमित्ताने तो अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील हजेरी लावत आहे. पण अक्षयने नच बलिये 9 या कार्यक्रमात येण्यास नकार दिला असल्याची चर्चा रंगली आहे. भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, नच बलिये या कार्यक्रमात मिशन मंगल या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित राहावे असे कार्यक्रमाच्या टीमचे म्हणणे होते. पण अक्षय आणि रवीना एकमेकांसोबत स्टेज शेअर करायला कर्म्फटेबल नाहीयेत. नच बलिये या कार्यक्रमाच्या या सिझनची परीक्षक रवीना आहे हे कळल्यानंतर अक्षयने या कार्यक्रमाचा हिस्सा व्हायला नकार दिला. अक्षय या कार्यक्रमात येणार नसला तरी मिशन मंगलमधील इतर कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. 

आता मिशन मंगलची टीम नच बलिये या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतेय का हे आपल्याला लवकरच कळेल.  

Web Title: Due to Raveena Tandon Akshay Kumar refuses to come on nach baliye 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.