बेबो अर्थात करिना कपूर सध्या तिच्या दुस-या प्रेग्नंसीमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या कामातही बिझी आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर ती सक्रिय असायची. प्रेग्नंसीच्या बातमीनंतर आता तिच्या चाहत्यांनाही तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात रस असतो. करिनाचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात ती दारूच्या नशेत मीडियाच्या कॅम-यांना पोज देत असल्याचे पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे करिनालाही दारू पिण्याची सवय आहे. मुळात करिनाला दारूची लत लागायला कारणीभूत तिचे वडील रणधीर कपूर असल्याचे म्हटले जाते. 


बॉलिवूड कलाकरांच्या होणा-या पार्ट्यांमध्ये तर या गोष्टी सर्रास सुरू असतात. त्यातलेच करिनाचे फोटो समोर आले आहे. मुळात करिना दारूच्या नशेत इतकी धुत झालेली दिसते की तिला स्वतःलाही सावरणे कठीण जाते. एरव्ही डाएटला घेवून कसे फिट रहावे याचे इतरांना धडे देणारी करिना स्वतः मात्र फुल ऑन दारूच्या नशेबत बुडालेली असते.

आज पर्यंत आपण  करिनाला असं कधीच पाहिलं नाहीय...मात्र  दारूच्या नशेतील तिचे हे  फोटो पाहून  तुम्हाला ही प्रश्न पडला असणार हा नक्की काय प्रकार आहे....दारूच्या नशेत करिना काय करेल याचाही नेम नसतो.इतकेच नाहीतर करिनाला सिगरेट पिण्याचीही लत आहे.आई बनल्यानंतरही करिना दारू आणि सिगरेट नशा करत असते. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग शिवाय जास्त दिवस राहणे करिनासाठी अशक्य असते. 


दुस-यांदा प्रग्नंसी एन्जॉय करणारी करिनाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, तैमूरच्या वेळी जी चूक मी केली ती यावेळी करणार नाही. “तैमूरच्या वेळी जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा सर्वजण मला खूप खायला सांगायचे आणि यामुळे माझे २५ किलो वजन वाढले होते. मला पुन्हा तसे करायचे नाही. यावेळी मला फक्त हेल्दी आणि फिट राहायचे आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि करिना 'टशन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले होते. दोघांनी पाच वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. खासगी आयुष्यातील ही लोकप्रिय जोडी प‍डद्यावर आपली छाप सोडू शकलेली नाहीये. बॉलिवूडमध्ये करीनाने जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. शिवाय करिअरमध्ये तिने सहा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्सह ब-याच अवॉर्ड्सवर आपली मोहोर उमटवली आहे. करिना कपूर लवकरच अमिर खानचा आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: DRUNK Kareena Kapoor Shows Unbelievable ATTITUDE Infront Of Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.