Aryan Khan Drugs Case: आर्यनला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव आलं समोर; अनन्या पांडेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 01:42 PM2021-10-24T13:42:59+5:302021-10-24T13:43:28+5:30

Aryan Khan Drugs Case: या चौकशीदरम्यान अनन्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला असून आर्यनला कोणती व्यक्ती ड्रग्ज पुरवायचा याचं नाव सांगितलं आहे. 

Drugs Case ananya pandey given hints ncb about a house help of big celebrity who supplied drugs to shahrukh khan son aryan khan | Aryan Khan Drugs Case: आर्यनला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव आलं समोर; अनन्या पांडेने केला खुलासा

Aryan Khan Drugs Case: आर्यनला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव आलं समोर; अनन्या पांडेने केला खुलासा

Next
ठळक मुद्देअनन्याने तिच्या मोबाईल चॅट्स आणि कॉन्टॅक्ट डिलीट केल्याचा संशय देखील एनसीबीला आहे.

ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली असून या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे.  सध्या या प्रकरणी आर्यनची मैत्रीण आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) हिची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान अनन्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला असून आर्यनला कोणती व्यक्ती ड्रग्ज पुरवायचा याचं नाव सांगितलं आहे. 

'tv9 हिंदी'च्या वृत्तानुसार, अनन्याने दिलेल्या टीपच्या आधारावर एनसीबीने (NCB) मालाडमधून एका सेलिब्रिटीच्या नोकराला (house help) ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारावर सोमवारी पुन्हा एकदा अनन्याची चौकशी केली जाणार आहे.  अनन्याने तिच्या मोबाईल चॅट्स आणि कॉन्टॅक्ट डिलीट केल्याचा संशय देखील एनसीबीला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिला चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

अनन्याने सांगितलं आर्यनला ड्रग्ज पुरवणाऱ्याचं नाव

गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी अनन्याची तब्बल ६ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये अनन्याने अनेक गौप्यस्फोट केले. यात आर्यनला ड्रग्ज पुरवणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखत असल्याचा खुलासा तिने केला. तिने दिलेल्या या माहितीच्या आधारावर एनसीबीने एका २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा तरुण एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या घरी नोकर म्हणून काम करतो. याच व्यक्तीने आर्यनपर्यंत ड्रग्स पोहोचवले असा खुलासा अनन्याने केला आहे.

अनन्या पांडेलाही होऊ शकते अटक?

अनन्याने आर्यनला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगितल्यानंतर एनसीबीने या तरुणाची चौकशी केली. या चौकशीमध्ये या तरुणानेदेखील काही खुलासे केले आहेत. त्यावरुन आता अनन्याची पुन्हा सोमवारी चौकशी केली जाणार आहे. सध्या एनसीबीकडून आर्यन खानच्या बँक अकाऊंटची तपासणी करण्यात येत आहे. आर्यनने ऑनलाइन ट्रांजक्शनच्या माध्यमातून पेमेंट करुन ड्रग्जची खरेदी तर केली नाही ना याचा तपास एनसीबी करत आहे. जर त्याने ड्रग्जसाठी ऑनलाइन पेमेंट केलं असेल तर ते कोणाच्या खात्यात ट्रान्सफर केले याचा शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान, मंगळवारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.  त्यापूर्वी एनसीबी आर्यनविरोधात पुरावे गोळा करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इतकंच नाही तर सोमवारपर्यंत एनसीबीला कोणताही ठोस पुरावा मिळाला तर अनन्या पांडेला ही अटक होऊ शकते.
 

Web Title: Drugs Case ananya pandey given hints ncb about a house help of big celebrity who supplied drugs to shahrukh khan son aryan khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app