'दृश्यम' सिनेमातल्या अजय देवगनची ऑनस्क्रीन मुलगी, या सुपरस्टारची आहे पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:00 AM2021-08-24T08:00:00+5:302021-08-24T08:00:00+5:30

‘दृष्ट्यम’ सिनेमातल्या सस्पेंसमुळे या सिनेमाने रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती.सिनेमाची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा सिनेमा हिट ठरला होता.

Do you know, Ajay Devgans Drishyam Movie Onscreen Daughter is wife of this superstar, check here who is it | 'दृश्यम' सिनेमातल्या अजय देवगनची ऑनस्क्रीन मुलगी, या सुपरस्टारची आहे पत्नी

'दृश्यम' सिनेमातल्या अजय देवगनची ऑनस्क्रीन मुलगी, या सुपरस्टारची आहे पत्नी

Next

‘दृष्ट्यम’ या सिनेमात इशिता दत्ताने अजय देवगनच्या मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर  ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ मध्येही ती झळकली होती. कपिल शर्मासोबत 'फिरंगी' सिनेमातही ती झळकली आहे. आपल्या भूमिकेने तिने रसिकांची पसंती मिळवली होती. इशिताने सिनेमाच नाहीत मालिकेतही काम केले आहे.

'एक घर बनाऊंगा' या मालिकेमध्ये सर्वात प्रथम इशिता दिसली होती. यानंतर 'बेपनाह प्यार है' या मालिकेतील इशिता ची भूमिका सुद्धा खूप गाजली होती. 'रिश्तों का सौदागर- बाजीगर'  आणि 'झलक दिखला जा' या डान्स रिऍलिटी शोमध्ये सुद्धा इशिता झळकली होती. इशिताने दाक्षिणात्य सिनेमातही काम केले आहे. 

इशिताही अभिनेत्री तनुश्री दत्ताची लहान बहीण आहे.आपल्या भूमिकांनी रसिकांची पसंती मिळवलेली इशिताला बॉलिवूडमध्ये  पाहिजे तसे यश मिळाले नाही. फार काळ इंडस्ट्रीत न रमता इशिताने लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली.

इशिताने अभिनेता वत्सल शेठसह रेशीमगाठीत अडकली. वत्सल शेठ 'टारझन द वंडर कार' सिनेमातून तो प्रसिद्ध झाला होता. '2017 मध्ये दोघांनी लग्न केले होते. विशेष म्हणजे या लग्नाची कुठेच चर्चा झाली नव्हती. लग्नाची कुठेच चर्चा होवू नये यासाठी प्रचंड काळजी घेतली गेली होती. या लग्नाला मोजकेच लोक निमंत्रित केले गेले होते.    


इशिताप्रमाणे वत्सल शेठलाही बॉलिवूडमध्ये काही खास संधी मिळाल्या नाहीत. त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या लुक्समुळेच तो जास्त चर्चेत असतो. प्रचंड मोठा त्याचा चाहता वर्ग आहे. तरुणी त्याची पिळदार बॉडी पाहून फुल ऑन फिदा होतात. सोशल मीडियावर इशिता आणि वत्सल दोघेही सक्रीय असतात. सतत दोघांचे काही ना काही एक्टीव्हीटी करतानाचे फोटो चाहत्यांसह शेअर करत कपल गोल देत असतात. 

इशिताच्या सोशल मीडियापेजवर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. तिच्या बोल्ड फोटोंमुळेही ती चर्चेत असते. मध्यंतरी इशिता प्रेग्नंट असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या. यावरही वत्सल आणि इशिता दोघांनीही मौन न बाळगता स्पष्टीकरण देत सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते.

Web Title: Do you know, Ajay Devgans Drishyam Movie Onscreen Daughter is wife of this superstar, check here who is it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app