Do you know This Actress ?, currently Kalki Koechlin Enjoys Pregnancy | या अभिनेत्रीला आपण ओळखले का?, सध्या प्रेग्नंसी करते एन्जॉय

या अभिनेत्रीला आपण ओळखले का?, सध्या प्रेग्नंसी करते एन्जॉय

सध्या प्रेग्नंसीमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कल्की सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने शेअर केलेला फोटो देखील लक्षवेधी ठरतो आहे. केशरी रंगाच्या बिकनीमध्ये तिने हा एक्सरसाईज करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. दिवसेंदिवस भन्नाट आयडीया लढवत कल्की आपले फोटोशूट करत तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंटसचा वर्षावही करत आहेत.

नेहमीप्रमाणे या फोटोतही कल्कीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. कल्की सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय. कल्की याच पियानो वादकाच्या बाळाची आई होणार आहे. नुकतीच कल्कीने आई बनणार असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती.
कल्की कोच्लिन लग्नाआधी आई होणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. कल्कीने अचानक आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. पण खरे सांगायचे तर सुरुवातीच्या दोन महिन्यांत खुद्द कल्कीलाही आपण प्रेग्नंट आहोत हे माहित नव्हते. होय, खुद्द कल्कीने हा खुलासा केला होता.2009 मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला.

कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका सुद्धा आहे. फ्रेंच वडील आणि भारतीय आई लाभलेल्या कल्कीचे आजोबा मॉरिस कोल्चिन हे आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे चीफ इंजिनिअर होते.कल्कीला फ्रेंचशिवाय हिंदी, इंग्लिश आणि तामिळ भाषा येतात. ‘देव डी’साठी कल्किला बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’,‘माय फ्रेंड पिंटो’,‘शैतान’,‘शंघाई’,‘एक थी डायन’ अशा अनेक चित्रपटांत झळकली आहे.

Web Title: Do you know This Actress ?, currently Kalki Koechlin Enjoys Pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.