ती आहे बोल्ड, ती आहे बिनधास्त... ती आहे इंटरनेटवरील मोस्ट सर्च्ड सेलिब्रिटी, नेटिझन्सना तिने अक्षरक्षः वेड लावलं आहे. बॉलीवुडची मस्तानी, देसी गर्लसुद्धा तिच्यापुढे फ्लॉप. ही ती म्हणजे पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनी. इंडो-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पॉर्नस्टार आहे. सनीने 'जिस्म २’ चित्रपटातून' बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती.

सनीनं तिचा अगदी बालपणापासून ते बॉलीवूडपर्यंतचा जीवनप्रवास तिच्या वेब सीरिजच्या माध्यमातून लोकांसमोर आणला. सनीची वेबसीरिज 'करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' रिलीज झाली आणि सनीचं अवघं आयुष्य एका पुस्तकाप्रमाणे जगासमोर आलं.  सनीचं हा जीवनप्रवास रसिकांनीही डोक्यावर घेत एकप्रकारे स्वीकारला.

रसिकांची लाडकी आणि हॉट फेव्हरेट असलेल्या सनीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही.  रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सनी कोट्यावधीची मालकीण आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार सनीकडे ९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वार्षिक उत्पन्न २ कोटींच्या घरात आहे. याशिवाय १.१४ कोटी किंमतीच्या अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे.

मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत जवळपास ३ कोटींच्या घरात आहे. याशिवाय अमेरिकेतही तिचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ३० कोटी आहे. सध्या सनी अभिनयासह तिचं आईपण एन्जॉय करत आहे. आपल्या मुलांसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

English summary :
Baby doll Sunny Leone property details: Check price of her house in Mumbai and America. For more updates on sunny leone visit us online at lokmat.com.


Web Title: Do u know Sunny Leone’s Wealth ? Here is details
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.