बॉलिूडमध्ये नवे लव्हबर्ड्सचं चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करणारी जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार अशाही जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.  विशेष म्हणजे वरुण धनव आणि नताशा दलाल  लग्नबंधनात अडकल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्याही लग्नाच्या खुमासदार चर्चा सध्या रंगु लागल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या नात्याविषयी कधीच खुलेपणाने भाष्य केलं नसले तरी गेल्या काही दिवसांपासून हे लव्हबर्ड मीडियाच्या नजरा चुकवत एकमेकांना भेटत आहेत.

दिवसेंदिवस वाढणा-या भेटीगाठींमुळे त्यांच्या चर्चा आता लग्नापर्यंत येऊन पोहचल्या आहेत. न्यू इअरचे सेलिब्रेशनवेळीही दोघेही एकत्र होते. त्यानंतर अधून मधून लंच डेट करताना दिसतात. इतकेच काय तर मालदीव्हजमध्येही दोघेही एकत्र व्हॅकेशनला गेले होते. तिथलेही त्यांचे फोटो त्यांनी शेअर केले होते.

फोटोमध्ये दोघेही एकत्र दिसले नसले तरीही एकाचवेळी दोघेही मालदीव्हजला गेल्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुलीच दिली होती. त्यावेळीही दोघांनी एकत्र मीडियाला पोज देणे टाळले होते. इतकेच काय तर त्यांचे नाते जगासमोर येऊ नये म्हणून चेहरे देखील लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ये पब्लिक है सब जानती है हेच सध्या दोघांसाठी लागु ठरते आहे.

गेल्या काही दिवसांपासून कियाराचे सिद्धार्थच्या घरी येणे जाणेही वाढले आहे.  नुकतेच कियाराला सिद्धार्थच्या घरी जाताना पाहिले. मात्र कियाराला मीडियाला बघताच चिंतेत दिसली. मीडियाच्या नजरा चुकवत कियारा सिद्धार्थच्या घरी पोहचली होती. या दोघांचेही फोटो समोर आले आहेत.

दोघांनीही एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नसली तरी त्याच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली देत असतात. त्यामुळे त्यांचे हे फोटो त्यांच्या प्रेमाची साक्ष सध्या देत आहेत. एकमेकांबद्दल असलेले प्रेम काही ते जगापासून लपवून ठेवू शकले नाहीत. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Do Dil Mil Rahe Hai Chupke-Chupke, kiara advani Reached sidharth malhotra home at late night on saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.