बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या सिनेमांपेक्षा कमीच पण खाजगी गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर सारा अली खान  बरीच एक्टिव्ह असते आणि वेगवेगळे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरील असाच आणखी एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोंमध्ये सारा  दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता विजय देवरकोंडासोबत एकत्र पाहायला मिळत आहेत. दोघांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळत आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून साराचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता विजय देवरकोंडासोबत अनेकदा फिरताना पाहिले गेले आहे.नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने पार्टीचे आयोजन केले होते. तेव्हाही सारा विजय देवरकोंडासोबतच जास्त वेळ घालवताना दिसली. फोटोंमध्ये पोज देतानाही ती विजय देवरकोंडासोबतच दिसली.

 

साराची विजय देवरकोंडासह वाढती मैत्रीच्या चर्चा आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचल्या आहेत. त्यामुळेच  सारा अली खान विजय देवरकोडांसह रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या लव्हबर्ड्सचं चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. चोरी चोरी चुपके चुपके या दोघांमध्ये  रिअल लव्हस्टोरी फुलू लागली असल्याचे संकेत वारंवार दोघे देत असतात.

 

 

चाहत्यांनाही या दोघांची जोडी परफेक्ट वाटत असून भरभरु लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहे.  येत्या काळात  सारा आणि विजय यांचेच सतत एकत्र फिरतानाचे फोटो गुपितही नक्कीच समोर येईल. मात्र या बातमीमुळे साराच्या फॅन्सचं हार्ट ब्रेक झालं असणार हे मात्र नक्की !

 

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिचा कुली नंबर १ चित्रपट नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. यात तिच्यासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत होता. याशिवाय ती 'अतरंगी रे'मध्येही झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर मुख्य भूमिका साकारत आहे. विजय देवरकोंडा 'लिगर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खानला विजय देवरकोंडाबरोबर काम करण्याची इच्छा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Do Dil Dil Rahe Hai Chupke-Chupke,sara ali khan and vijay devarakonda In Relationship they seen together Many Times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.