ठळक मुद्देसध्या मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत.

बॉलिवूडमध्ये दिवाळसण मोठ्या उत्साहात साजरा झाला. बच्चन कुटुंबासह अनेक सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टी होस्ट केली आणि या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी रंगत आणली. या दिवाळी पार्ट्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यातलाच एक व्हिडीओ सध्या जाम चर्चेत आहे. तो कुणाचा तर मलायका अरोराचा. होय, दिवाळीच्या दिवशी मलायकाने धम्माल मज्जा केली. तिचा नवा डान्स व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही खात्री पटेल. दिवाळी सेलिब्रेशनचे अनेक फोटो मलायकाने शेअर केले आहेत. पण तिच्या डान्स व्हिडीओची बातच न्यारी.

बेस्ट ठुमकाज, असे म्हणत ‘मलायका लव्हर’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.


मलायकानेही तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती आपल्या कुटुंबीयांसोबत दिसतेय. यात तिचा मुलगा अरहान आणि बहीण अमृता अरोरा दिसत आहेत.


यानंतर अनिल कपूरने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत मलायका सामील झाली. बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत तिने झक्कास एन्ट्री घेतली. यावेळी तिचा वेस्टर्न आऊटफिट्समधला अवतार खास होता.
 

अमिताभ बच्चन यांच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीतही बहीण अमृता अरोराबरोबर ती दिसली. त्याचा  व्हिडिओही व्हायरल होतोय. एकंदर काय तर दिवाळी आणि दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मलायका भाव खाऊन गेली. सध्या मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. 46 वर्षांची मलायका स्वत:पेक्षा 11 वर्षांनी लहान अर्जुनला डेट करतेय. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असेही मानले जात आहे. नुकताच मलायकाचा वाढदिवस साजरा झाला होता. मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अर्जुनने तिला किस करत असतानाचा फोटो शेअर केला होता.

Web Title: diwali party actress malaika arora dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.