Disha salian photo viral with aishwarya rai and people trolled actress | जेव्हा ऐश्वर्या रायची मॅनेजर होती दिशा सालियन, फोटो समोर आल्यावर लोकांनी केलं तिला ट्रोल

जेव्हा ऐश्वर्या रायची मॅनेजर होती दिशा सालियन, फोटो समोर आल्यावर लोकांनी केलं तिला ट्रोल

सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा 8 जूनला संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. यानंतर एक आठवड्याने सुशांत त्याच्या घरात मृत अवस्थेत आढळला. सुशांतच्या मृत्यूची चौकशी सीबीआय, ईडी आणि एनसीबी करतायेत. दिशा सालियनने ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर म्हणून देखील काम केले होते. सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे. ज्यात दिशा आणि ऐश्वर्या एअरपोर्टवर दिसतायेत. 

हा फोटो 2016मधला आहे. जेव्हा ऐश्वर्या सरबजीत सिनेमाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादवरुन मुंबईला परत येत होती. यात ऐश्वर्याने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे तर दिशाने रेड कलरचा टॉप घातलेला दिसतोय. फोटो दिशा ऐश्वर्याच्या मागे दिसतेय. या फोटोवर  मीडियावर येताच लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एक व्यक्तीने लिहिले, हे मोठे लोक किती विचित्र आहेत. दिशाने ऐश्वर्यासोबत काम केले पण तरीही त्याच्या मृत्यनंतर तिने एक ट्विटही केले नाही. यावरुन कळते की हे लोक फक्त पैशाचे असतात. 

दिशाच्या आई वासंती सालियन यांनी एक मुलाखती दरम्यान सांगितले होते की, त्यांच्या मुलीने ऐश्वर्या रायसोबत दोन वर्षे काम केले होते. दिशा ऐश्वर्याची मॅनेजर होती. दिशाने ऐश्वर्यासोबत तीन सिनेमांसाठी काम केले होते, जज्बा, ऐ दिल है मुश्किल आणि सरबजीत.

मृत्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून १०० हा क्रमांक डायल करून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता असा दावा केला जात होता. मात्र, दिशाने १०० क्रमांकावर फोन केलाच नव्हता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना फोन केल्यानंतर दिशाने सुशांतला फोन केला असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला होता. दिशाने पोलिसांना आणि सुशांतला फोन करून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडलं आहे आणि जीव धोक्यात आहे असं सांगितलं होतं, अशी चर्चा होती. मात्र, मुंबई पोलिसांनी हा दावा खोडून काढला आहे.

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Disha salian photo viral with aishwarya rai and people trolled actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.