Disha Patani's sizzling look will be seen in this song | दिशा पटानीचा सिझलिंग लूक आला आहे चर्चेत, बोल्ड अदांनी या गाण्यातून घायाळ करण्यासाठी झाली सज्ज

दिशा पटानीचा सिझलिंग लूक आला आहे चर्चेत, बोल्ड अदांनी या गाण्यातून घायाळ करण्यासाठी झाली सज्ज

'बागी ३' चित्रपटातील 'दस बहाने 2.0' आणि 'भंकस' सारख्या चार्टबस्टर गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर निर्मात्यांनी आगामी गीतातील 'डू यू लव्ह मी'मधील दिशा पटानीचा सिझलिंग लूक रिलीज केला आहे. तिचा हा लूक पाहून त्याचे चाहते या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

बागी ३ चित्रपटातील 'डू यू लव्ह मी' गाण्याबद्दल दिशा पटानी म्हणाली की, हे एक असे गाणे आहे, जे निश्चितपणे तुम्हाला आपल्या ठेक्यावर थिरकायला लावेल. जेव्हा मी हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हाच मी याच्या प्रेमात पडले होते. मी या आधी कधी अशा प्रकारची नृत्यशैली आजमावली नव्हती. हे आव्हानात्मक होते, पण मी या दरम्यान खूप एन्जॉय केले. आदिल सरांनी (शेख, कोरियोग्राफर) याला छान शूट केले आणि अहमद सरांनी मी यात सर्वोत्तम दिसेन याची काळजी घेतली आहे. मला खात्री आहे की हे गाणे दर्शकांना नक्कीच आवडेल"


'डू यू लव्ह मी' हे गाणे तनिष्क बागची यांनी लिहिले असून निखिता गांधी यांनी गायले आहे. हा ट्रॅक ब्रिटिश रिकॉर्डचे निर्माते ट्रॉयबॉय यांच्या डूयूचा रीमेक आहे. या गाण्यातील हुक लाइन वगळता संपूर्ण गाणे हिंदी आहे.


बागी ३ चित्रपट ६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट नाडियादवाला ग्रँडसन द्वारे निर्मित असून याचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Disha Patani's sizzling look will be seen in this song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.