'बागी २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे रसिकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. दिशा पटानी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. ती व टायगर रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते दोघे एकत्र स्पॉट झाले की त्यांच्या चर्चांना उधाण येते. पण आता मात्र दिशाचे एक्स बॉयफ्रेंडसोबत काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


दिशा पटानी एकेकाळी प्रसिद्ध टिव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सध्या पार्थ एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये अनुरागची भूमिका साकारत आहे.

दिशा तिच्या मॉडेलिंगच्या काळात जवळपास 1 वर्ष पार्थला डेट करत होती. पण अचानक या दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ दिशाला चिट करत होता आणि याबाबत दिशाला समजल्यावर तिनं पार्थ पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण या दोघांनीही याबाबत बोलणं टाळलं.


पार्थसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा बराच काळ दुःखी होती. पण नंतर तिनं स्वतःला सावरलं आणि बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवण्याकडे भर दिला. सध्या पुन्हा एकदा दिशा आणि पार्थचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यासोबत त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा.


पार्थसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा आणि टायगर भेटले. मागच्या काही वर्षांपासून टायगर आणि दिशा एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही कबुली दिली नसली तरीही दोघांचे कुटुंबीयही एकमेकांशी खूप जवळचे आहेत. 

Web Title: Disha Patani's photo with Ex boyfriend was viral, because of the breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.