इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिशा पाटनीवर पुन्हा एकदा नेटक-यांनी निशाणा साधला आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. दिशा पाटनीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.  सतत ती तिचे विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांचे खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात. मात्र नुकताच तिने शेअर केलेला फोटो पाहून तिचे चाहते संमिश्र प्रतिक्रीया देत आहेत. तसे बघायला गेले तर दीशाचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणे हे काय नवीन राहिलेले नाही. मात्र तरीही तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले असून तिची खिल्लीसुद्धा उडवली जात आहे. 


ती तिच्या बॉलिवूड सिनेमापेक्षा खाजगी कारणामुळेच जास्त चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये तसेही अफेअर या गोष्टी प्रत्येक अभिनेत्रीशी जोडलेले असतातच. तसेच काहीसे दिशाबद्दलही आहे.  दिशाचे टायगर श्रॉफसह नाव जोडले जाते. मात्र यावर दोघेही बोलणे पसंत करत नाही. अनेक मुलाखतीमध्ये टायगर यावर स्पष्टीकरण देत सांगतो की, ''आम्ही केवळ चांगले मित्र आहोत'', हे दोघांचेही ठरलेले वाक्य. एका ताज्या मुलाखतीत दिशाला नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. ‘तुम्ही दोघंही तुमचं नातं स्वीकारत का नाही’, असा थेट प्रश्न दिशासमोर ठेवला गेला. या प्रश्नाने दिशा थोडी अवघडली. पण अशा प्रश्नांना चतुराईने टाळायचे अंगी असलेले कसब तिने यावेळीही दाखवले.


तसेच टायगरसोबत अफेअर तर सोडाच, पण मी अद्याप त्याला इंम्प्रेस करू शकलेले नाही, असे दिशा या प्रश्नावर म्हणाली. ‘टायगरला इम्प्रेस करणे फार कठीण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या एकाच गोष्टीसाठी मी प्रयत्न करतेय. पण अद्यापही मी त्याला इंप्रेस करू शकलेले नाही. माझे नशीब मला साथ देत नाहीये. आम्ही दोघं एकत्र फिरतो, लंच डिनर करतो पण याचा अर्थ असा नाही की या सर्व गोष्टींनी तो इम्प्रेस होतो. निदान तुमचा क्रश इम्प्रेस होतो तसा तर नाहीच नाही. त्यामुळे तुम्ही पुढच्या वेळी त्यालाच हा प्रश्न विचारा सांगत दिशाने वेळ मारून नेली होती.

Web Title: Disha Patani's Most Sexy Pic On Internet Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.