Disha patani's ex-boyfriend parth samthan to debut in bollywood with alia bhatt in gangubai kathiawadi | आलिया भटसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार दिशा पटानीचा एक्स बॉयफ्रेंड पार्थ समथान!

आलिया भटसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार दिशा पटानीचा एक्स बॉयफ्रेंड पार्थ समथान!

टीव्ही अभिनेता पार्थ समथान गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारणावरून चर्चेत आहे. पार्थ समथनने 'कसौटी जिंदगी के 2' सोडण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान मेकर्सनी 'कसौटी जिंदगा के2' मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, पार्थ समथान मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे पण पार्थने हा निर्णय का घेतला यामागचे कारण आता समोर आले आहे. 

पार्थ समथान दिसणार आलिया भटसोबत 

रिपोर्टनुसार, पार्थ समथान लवकरच संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा 'गंगूबाबाई काठियावाडी'मध्ये दिसणार आहे.आलिया भटच्या या चित्रपट महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. पार्थ यात महत्त्वाच्या भूमिकेत. पार्थ यात आलियाच्या अपोझिट दिसणार आहे. पार्थ मोठ्या बॅनरमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.  3 ऑक्टोबर 2020मध्ये एकता कपूरची मालिका 'कसौटी जिंदगी के 2'चा शेवटचा भाग  शूट करणार आहे. 

आलिया या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.आलिया पहिल्यांदाच या चित्रपटातून एका महिला गँगस्टरची भूमिका साकारत आहे.  चित्रपटाची कथा ही हुसैन जैदी ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेली आहे. पण खरी कथा ही गंगूबाई काठीयावाडी हिच्या आयुष्यावर आधारित आहे.
 

दिशा पटानीसोबत होता रिलेशनशीपमध्ये

दिशा आणि पार्थ एकमेंकासोबत जवळपास एकवर्ष रिलेशनशीपमध्ये होते. दिशा त्यावेळी पार्थला डेट करायची जेव्हा ती इंडस्ट्रीत फारशी अ‍ॅक्टिव नव्हती. तर पार्थ त्यावेळी चांगलाच प्रसिद्धीझोतात होता. या दोघांमध्ये काही कारणाने ब्रेकअप झाले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Disha patani's ex-boyfriend parth samthan to debut in bollywood with alia bhatt in gangubai kathiawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.