दिशा पाटनीचा हा ड्रेस पाहून ट्रोलर्स झाले अ‍ॅक्टिव्ह, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 05:29 PM2021-01-20T17:29:22+5:302021-01-20T17:29:42+5:30

नुकतीच दिशा मुंबईच्या रस्त्यावर दिसली आणि तिचा अवतार पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

disha patani gets trolled on social media for her dressing sense | दिशा पाटनीचा हा ड्रेस पाहून ट्रोलर्स झाले अ‍ॅक्टिव्ह, म्हणाले...

दिशा पाटनीचा हा ड्रेस पाहून ट्रोलर्स झाले अ‍ॅक्टिव्ह, म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

आपल्या ग्लॅमरस लूकमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री दिशा पाटनी कधीकधी ट्रोलही होते. सध्या दिशाला तिच्या लूकमुळे ट्रोल केले जातेय. नुकतीच दिशा मुंबईच्या रस्त्यावर दिसली आणि तिचा अवतार पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

दिशाने यावेळी पांढ-या कलरचे स्वेटर कॅरी केले होते. पण तिचा हा ड्रेसिंग सेन्स अनेकांना आवडला नाही. मग काय ब-याच लोकांनी तिची खिल्ली उडवणे सुरु केले. ‘थंडी जरा जास्त आहे, नाही?’ असे काहींनी लिहिले तर काहींनी यावर ‘कन्फ्यूज्ड डॉट कॉम सेन्स’चा शिक्का मारला.

जेव्हा स्वेटरवर 80 टक्के आॅफ असतो, असे लिहित एका युजरने दिशाला ट्रोल केले.  हे इतके कपडे घालून उपकार केलेस आमच्यावर, अशा प्रतिक्रियाही काहींनी दिल्या.
‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असलेली दिशा रोज नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दिशा बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा आपल्या फिटनेसला घेऊन खूपच अर्लट असते. ती नेहमीच जीममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे.यासोबतच, दिशा लवकरच 'एक विलेन 2' मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन 'मलंग'चा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.

 

Web Title: disha patani gets trolled on social media for her dressing sense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.