disha patani gets life threat from pakistan | दिशा पाटनीच्या जीवाला धोका? पाकिस्तानातून धमक्यांचे फोन?

दिशा पाटनीच्या जीवाला धोका? पाकिस्तानातून धमक्यांचे फोन?

ठळक मुद्दे‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. होय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशाच्या जीवाला धोका आहे. तिला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्या का मिळत आहेत, कोण देत आहे, याबद्दल अधिकृत माहिती नाही.

तेलगू एंटरटेनमेंट पोर्टल ‘टॉलिवूड नेट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिशाला फोन कॉल्सद्वारे धमक्या दिल्या जात असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. पाकिस्तानातील एका नंबरवरून तिला या धमक्या मिळत आहेत. दिशाच्या जवळच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
वृत्तानुसार, केवळ दिशालाच नाही तर पोलिसांनाही असे कॉल्स येत आहेत. ‘अकाऊंट करो जल्दी, जल्दी, तेरा लडकी (दिशा पाटनी) नहीं बचेगा’, अशी धमकी कॉलवरून मिळत आहे. धमक्या मिळत असलेले नंबर पाकिस्तानचे आहेत. दिशाकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या वृत्तातील दाव्याबद्दल खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.

‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असलेली दिशा रोज नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे.यासोबतच, दिशा लवकरच ‘एक विलेन 2’ मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन ‘मलंग’चा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: disha patani gets life threat from pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.