दिशा पाटनी ही तिच्या अ‍ॅक्टिंगसोबत फिटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. दिशाच्या इंटेंस वर्कआऊटचे रोज नवे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. दिशा पटानीने सोशल मीडियावर एका फोटो शेअर केला आहे जो खूप व्हायरल होतो आहे. दिशा या फोटोत एका महागड्या कारच्या पुढे उभी दिसतेय. मात्र दिशाने हि कार खरेदी केली की ती या कारची जाहिरात करते आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. दिशाच्या फोटोत दिसत असलेल्या रेंज रोवर कारची किंमत 1 कोटी 52 लाख आहे. 


दिशाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित होता. यानंतर दिशाने मागे वळून पाहिले नाही.


सध्या दिशा ‘मलंग’ या चित्रपटात बिझी आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात दिशासोबत आदित्य राय कपूर, अनिल कपूर व कुणाल खेमू लीड भूमिकेत आहेत. 2020 मध्ये व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.याशिवाय दिशा सलमान खानसोबत राधे सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.

Web Title: Disha patani brand new range rover worth rs 1.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.