ठळक मुद्देटायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘गणपत’ या सिनेमात दिसणार आहे.

एकीकडे कोरोना वाढतोय आणि दुसरीकडे बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी व्हॅकेशनच्या मूडमध्ये दिसताहेत. गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी व्हॅकेशनवर गेलेत, परतले. आता बॉलिवूडचा हँडसम अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) व त्याची गर्लफ्रेंन्ड दिशा पाटनी (Disha Patani) दोघेही व्हॅकेशनसाठी रवाना झालेत. कुठे तर बॉलिवूडचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन मालदीवला. दोघांचे मुंबई एअरपोर्टवरचे फोटो व्हायरल झालेत. पण हे काय, हे फोटो पाहून युजसचा संताप अनावर झाला. (Disha Patani and Tiger Shroff spotted at Mumbai airport)

काही दिवसांपूर्वी्नच दिशाने समुद्र किना-याचा फोटो शेअर करत, ती व्हॅकेशन मिस करत असल्याचे म्हटले होते. आता दिशा व्हॅकेशन मिस करत आहे म्हटल्यावर टायगरने तिची व्हॅकेशनची इच्छा पूर्ण केली आणि दोघेही मालदीवला रवाना झालेत.

टायगर व दिशा दोघांनाही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने दोघांचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि मग काय, हे फोटो पाहताच अनेक युजर्स भडकले.
देशात कोरोनाचा कहर सुरु आहे आणि यांना व्हॅकेशन सुचतेय, असे एका युजरने लिहिले. हेच लोक मालदीववरून कोरोनाचा नवा स्ट्रेन घेऊन येणार, अशा शब्दांत एक युजर या फोटोंवर रिअ‍ॅक्ट झाला.

हे सेलिब्रिटी लोकांना घरात राहा सांगतात आणि स्वत: व्हॅकेशन एन्जॉय करतात, असे एक युजर म्हणाला. एका युजरने तर व्हॅकेशनवर लाखो रूपये खर्च करण्यापेक्षा ते पैसे गरजू लोकांना दान करा, असा सल्ला दिला.
टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘गणपत’ या सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्या अपोझिट क्रिती सॅननची वर्णी लागली आहे. याशिवाय ‘हिरोपंती 2’ या सिनेमातही टायगर झळणार आहे. दिशाचे म्हणाल तर ‘राधे- मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात ती सलमानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मोहित सूरीच्या ‘एक विलेन रिटर्न्स’मध्येही ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: disha patani and tiger shroff spotted at mumbai airport headed for maldives vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.