director rajiv rai all set to start bobby deols gupt sequel | लवकरच येतोय बॉबी देओलच्या ‘गुप्त’चा सीक्वल!!

लवकरच येतोय बॉबी देओलच्या ‘गुप्त’चा सीक्वल!!

ठळक मुद्दे‘गुप्त’ हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या थ्रीलर, सस्पेन्स चित्रपटात बॉबी देओल, मनीषा कोईराला, काजोल प्रमुख भूमिकेत होते.

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने एकेकाळी एका पाठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपट दिलेत. यादरम्यानचा असाच एक हिट चित्रपट ‘गुप्त’ तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटाने बॉबीला ना केवळ बॉलिवूड सुपरस्टार म्हणून ओळख दिली, तर नंबर गेममध्येही बॉबी वरच्या स्थानावर पोहोचले. इतक्या वर्षांनंतर आम्हाला ‘गुप्त’ आठवण्याचे कारण काय, तर एक ताजी बातमी. होय, ताजी चर्चा खरी मानाल तर लवकरच बॉबीच्या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ‘गुप्त’चे दिग्दर्शक राजीव राय यांनी अलीकडे याबाबतचे संकेत दिलेत.

माझ्याकडे ‘गुप्त 2’साठी एक चांगली कल्पना आहे. लवकरच मी या सीक्वलवर काम सुरु करणार. अद्याप मी स्क्रिप्ट लिहिलेली नाही. माझ्याकडे एक कल्पना आहे. ती ‘गुप्त’च्या सीक्वलसाठी अगदी परफेक्ट आहे. यात प्रेक्षकांना सगळे काही नवे पाहायला मिळेल. कारण ‘गुप्त’ची हॅपी एन्डींग पे्रक्षकांनी पाहिली आहे, असे राजीव राय म्हणाले. गेल्या काही वर्षांत मी 5-6 स्क्रिप्टवर काम करतोय. पण आता मी केवळ एका स्क्रिप्टवर लक्ष देणार आहे. या वर्षाच्या एप्रिलपर्यंत माझ्या आगामी चित्रपटाची घोषणा होईल. माझा हा प्रोजेक्ट मर्डर मिस्ट्री असेल. यात सस्पेन्स असेल, थ्रील असेल, असेही त्यांनी सांगितले. ‘गुप्त’ हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या थ्रीलर, सस्पेन्स चित्रपटात बॉबी देओल, मनीषा कोईराला, काजोल प्रमुख भूमिकेत होते. याशिवाय परेश रावल,ओम पुरी, राज बब्बर यांच्याही खास भूमिका होत्यर. या चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रीय झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: director rajiv rai all set to start bobby deols gupt sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.