ठळक मुद्देडिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली.

‘राज’ या चित्रपटात दिसलेला बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेता डिनो मोरिया तुम्हाला आठवत असेलच. आज डिनो रूपेरी पडद्यावरून गायब आहे. पण एकेकाळी याच डिनोवर तरूणी फिदा होत्या. ‘राज’ या चित्रपटाच्या सेटवर डिनो बिपाशा बासूला भेटला होता आणि पुढे त्यांच्या अफेअरच्या चर्चा प्रचंड गाजल्या होत्या. हाच डिनो सध्या कुठे आहे, काय करतो, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, आज डिनोचा वाढदिवस. गेल्या काही वर्षांत डिनो प्रचंड बदलला आहे. अर्थात फिटनेसवरचे त्याचे प्रेम मात्र अद्यापही कायम आहे. 

डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.

‘राज’नंतर डिनो अनेक सिनेमात दिसला. पण हे सर्व चित्रपट एकापाठोपाठ आपटले. चित्रपट चालत नाहीत, म्हटल्यावर डिनो रिअ‍ॅलिटी शोकडे वळला. 2010 मध्ये ‘खतरों के खिलाडी’चे विजेतेपदही त्याने पटकावले. पण यानंतर डिनोला चित्रपट मिळणे बंद झाले.

हाताला काम हवे म्हणून डिनोने डीएम जिम नावाने एक फिटनेस सेंटर उघडले होते. यात तत्कालीन युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचीही भागीदारी होती. पण 2016 मध्ये आदित्यसोबत झालेल्या वादानंतर डिनोने हे फिटनेस सेंटर बंद केले.

यानंतर डिनोने त्याच्या कॅफे बिझनेसवर लक्ष केंद्रीत केले. गत जानेवारी महिन्यांत डिनो कमबॅक करणार, अशी बातमी आली. पण अद्याप तरी डिनोच्या कमबॅक प्रोजेक्टची घोषणा झालेली नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: dino morea birthday some unknown facts about his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.