Dilwale Dosanjh did not give the Hollywood Wonder Woman a quote! Fans taken by fans! | ​ दिलजीत दोसांजला हॉलिवूडच्या ‘वंडर वूमन’ने दिला नाही भाव! चाहत्यांनी घेतली फिरकी!!

​ दिलजीत दोसांजला हॉलिवूडच्या ‘वंडर वूमन’ने दिला नाही भाव! चाहत्यांनी घेतली फिरकी!!

पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह आहे. त्याची फॅन फॉलोर्इंगही मोठी आहे. पण दिलजीतचे म्हणाल तर तो स्वत: मोठ -मोठ्या स्टार्सला फॉलो करण्यावर विश्वास ठेवतो. यातच त्याला हॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या स्टेट्सवर कमेंट करण्याची सवय लागलीयं. होय, आधी दिलजीत रिअ‍ॅलिटी स्टार केली जेनर हिच्यावर एकतर्फी कमेंट्स करताना दिसला. सध्या त्याने हॉलिवूडची वंडर वूमन गॅल गॅडोट हिला निवडले आहे. गॅलने आठवड्याभरापूर्वी स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत गॅलने काहीशी भारतीय स्टाईलची कुर्ती घातलेली होती. मग काय, दिलजीतने गॅलचा हा फोटो पाहिला आणि त्यावर कमेंट्स देण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. ‘कुडी पंजाबन लगदी आ....’ असे दिलजीतने लिहिले. दिलजीतने गॅलच्या फोटोवर केलेली ही कमेंट्स बघून काय होणार?  यानंतर चाहत्यांनी दिलजीतचीच फिरकी घ्यायला सुरुवात केली. ‘दिलजीत पाजी ब्याह करणे का टाइम आ गया...’ असे एकाने लिहिले तर ‘ये नहीं पटेगी पाजी,’ असे दुसºयाने लिहिले. एकाने ‘गॅल, प्लीज रिप्लाय हिम,’ असे सांगत दिलजीतची खेचली.


यापूर्वी दिलजीत केली जेनरच्या प्रेमात पडला होता. तिच्या प्रत्येक फोटोवर दिलजीत कमेंट्स द्यायचा. पण केलीने दिलजीतला जराही भाव दिला नाही. आता केली प्रेग्नंट आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर यावरूनही दिलजीतची फिरकी घेतली जात आहे. केली प्रेग्नंट असल्याने दिलजीतने आता गॅलला निवडलेयं, अशा कमेंटस काहींनी केल्या आहेत. तूर्तास गॅलनेही दिलजीतच्या कमेंट्सला उत्तर दिलेले नाही. आता केली, गॅल दिलजीतला भाव देवो वा ना देवो, पण यानिमित्ताने दिलजीतच्या चाहत्यांचे मनोरंजन होते, हे मात्र नक्की.
पंजाबी सुपरस्टार दिलजीत लवकरच रायझिंग स्टारच्या सीझन २ला जज करताना दिसणार आहे. यानंतर तो हॉकी खेळाडू संदीप सिंहचे बायोपिक ‘सूरमा’मध्येही दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dilwale Dosanjh did not give the Hollywood Wonder Woman a quote! Fans taken by fans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.