dil bechara trailer sushant singh rajput t-shirt i saying about his real life problems know what was the message | ‘दिल बेचारा’चा हा सीन पाहून चाहते हळहळले, सुशांतच्या टी-शर्टवरचे ते शब्द वाचून डोळे पाणावले 

‘दिल बेचारा’चा हा सीन पाहून चाहते हळहळले, सुशांतच्या टी-शर्टवरचे ते शब्द वाचून डोळे पाणावले 

ठळक मुद्देदिल बेचारा हा सुशांतचा सिनेमा येत्या 24 जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ची चर्चा जोरात आहे. काल सोमवारी सुशांतच्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि काहीच तासांत या ट्रेलरला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अवघ्या एका तासांत या ट्रेलरला 50 लाखांवर व्ह्युज मिळालेत. 20 तासांत अडीच कोटी लोकांनी हा ट्रेलर पाहिला. लाइक्सचे म्हणाल तर पहिल्या काहीच तासांत या ट्रेलरला 50 लाखांवर लाइक्स मिळालेत.   ट्रेलरचे एक ना अनेक स्क्रिनशॉट्स, सीन्स व्हायरल झालेत आणि यापैकीच एका सीनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ट्रेलरमधील काही सेकंदाचा हा सीन पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले.

ट्रेलरमध्ये हा सीन सगळ्यात शेवटी येतो. ‘तुम मेरी गर्लफ्रेन्ड अभी नहीं हो या फिर कभी नहीं...,’ असे या सीनमध्ये सुशांत किज्जीला (सिनेमाची हिरोईन संजना सांघी) विचारतो. यावर किज्जी नुसतीच हसते. या सीनने चाहत्यांना भावूक केलेच पण या सीनमध्ये सुशांतने घातलेल्या टी-शर्टवरची अक्षरे पाहून चाहत्यांच्या भावना अनावर झाल्या. सुशांतच्या या टी-शर्टवर ‘हेल्प’ असे लिहिलेले या सीनमध्ये दिसतेय. चाहत्यांनी ही गोष्ट लगेच हेरली आणि चाहते व्यक्त झालेत.

तो सतत हसायचा पण त्याची टी-शर्ट सांगतेय, त्याला मदत हवी होती, असे एका युजरने ट्रेलरमधील हा सीन पाहून लिहिले.

एक युजर तर हा सीन आणि सुशांतची टी-शर्ट पाहिल्यानंतर इतका भावूक झाला की, आता माझ्याकडे शब्दच नाहीत, असे लिहित त्याने आपल्या भावना व्यक्त केल्यात.
दिल बेचारा हा सुशांतचा सिनेमा येत्या 24 जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: dil bechara trailer sushant singh rajput t-shirt i saying about his real life problems know what was the message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.